Goa Tourism Dainik Gomantak
गोवा

Goa Tourism: दोना पावला जेटीवर जाणाऱ्या पर्यटकांची सुरक्षा धोक्यात! देखभालीचा अभाव, सिसील रॉड्रिग्ज यांची टीका

Dona Paula Jetty Safety: पर्यटकांसाठी गोव्यातील आकर्षण असलेल्या आणि काही वर्षांपूर्वी नूतनीकरण केलेल्या दोना पावला जेटीवर जाणाऱ्या पर्यटकांची सुरक्षा धोक्यात आली आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: पर्यटकांसाठी गोव्यातील आकर्षण असलेल्या आणि काही वर्षांपूर्वी नूतनीकरण केलेल्या दोना पावला जेटीवर जाणाऱ्या पर्यटकांची सुरक्षा धोक्यात आली आहे. या प्रकल्पावर कोट्यवधी रुपये खर्च होऊनही देखभालीचा अभाव दिसून येत आहे.

जेटीवर जाणाऱ्यांना तिकीट आकारणी होते आणि त्याचे कंत्राटही दिले गेले आहे, पण त्या कंत्राटदाराकडूनही या जेटीवरील सुरक्षेविषयी काळजी घेतली जात नसल्याचे स्पष्ट दिसत आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्त्या सिसील रॉड्रिग्ज यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, येथे येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होत असून त्यांच्या जीवाशी खेळ होत आहे.

याप्रकरणी त्यांनी महानगरपालिकेच्या कारभारावरही टीका केली. जेटीला भेट दिल्यास सुरक्षितता आणि देखभालीशी संबंधित अनेक समस्या दिसून येतात. समुद्राच्या दिशेने जेटीच्या कडेला बसवलेल्या संरक्षक रेलिंगला (कठड्यांना) गंज चढू लागला असून अनेक ठिकाणी त्या सैल झाल्या आहेत. काही भागांत रेलिंगचे नुकसान झाले आहे, ज्यामुळे गंभीर अपघाताची भीती निर्माण झाली आहे. कमकुवत झालेल्या रेलिंगव्यतिरिक्त, जेटीकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसते. येथील अनेक दिवे बंद आहेत.

संबंधित यंत्रणांनी पाहणी करावी

पर्यटकांकडून ५० रुपये प्रवेश शुल्क आकारले जाते, तेथे पर्यटकांची सुरक्षितता पाहिली गेली पाहिजे. संबंधित यंत्रणांनी त्वरित जेटीची पाहणी करावी, आवश्यक दुरुस्त्या कराव्यात. पर्यटकांचा जीव धोक्यात टाकला जाऊ नये. खराब झालेले रेलिंग त्वरित बदलले जावेत आणि खराब झालेले दिवे लावले जावेत, अशी मागणी सिसील रॉड्रिग्ज यांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

AUS vs SA: कॅन्सरवर मात करुन 10 वर्षांनंतर संघात परतला, पण 33 चेंडू खेळूनही खातं उघडता आलं नाही; ऑस्ट्रेलियन खेळाडूच्या नावावर नकोसा रेकॉर्ड

Jeffrey Archer: संसद ते तुरुंग अन् तिथून 'बेस्टसेलर' लेखकापर्यंत! जेफ्री आर्चर यांचा थक्क करणारा प्रवास

Nobel Peace Prize 2026: भारतीय वंशाच्या ‘नावी’ पिल्लई यांना मानाचा नोबेल शांतता पुरस्कार जाहीर; न्यायासाठीचा संघर्ष ठरला यशस्वी

Arjun Tendulkar Injury: अर्जुन तेंडुलकरला दुखापतीचा फटका; गोव्याच्या रणजी सलामीच्या सामन्याला मुकणार!

Weightlifting Coach Recruitment: वेटलिफ्टिंग प्रशिक्षक निवडीला पुन्हा 'ब्रेक'; सर्वोच्च न्यायालयाकडून प्रकरण फेरसुनावणीसाठी परत

SCROLL FOR NEXT