Tourist Harassment: पर्यटकांना सतावणाऱ्या तेरा दलालांवर कारवाई, प्रत्येकी 5 हजारांचा ठोठावला दंड

Calangute police arrest 13 touts: कळंगुट आणि बागा यांसारख्या गजबजलेल्या पर्यटन स्थळांवर पर्यटकांची होणारी सतावणूक आणि वाहतूक कोंडी रोखण्यासाठी कळंगुट पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी पुन्हा एकदा धडक मोहीम राबवली.
Tourist Harassment
Tourist HarassmentDainik Gomantak
Published on
Updated on

म्हापसा: कळंगुट आणि बागा यांसारख्या गजबजलेल्या पर्यटन स्थळांवर पर्यटकांची होणारी सतावणूक आणि वाहतूक कोंडी रोखण्यासाठी कळंगुट पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी पुन्हा एकदा धडक मोहीम राबवली. या विशेष मोहिमेदरम्यान पोलिसांनी एकूण १३ दलालांना ताब्यात घेतले.

या सर्व दलालांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, प्रत्येकी ५ हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. पर्यटकांना विनाकारण त्रास देणाऱ्या आणि सार्वजनिक सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्यांविरुद्ध हे पाऊल उचलण्यात आले आहे. पोलिसांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे की, हे केवळ सुरुवातीचे दंड असून यापुढेही जे दलाल वारंवार या कृत्यात आढळतील, त्यांच्यावर अधिक कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.

Tourist Harassment
Responsible Tourism in Goa: त्रास फक्त पर्यटकांनाच होतो, गोमंतकीयांना होत नाही का? बेजबाबदार वर्तनामुळे वादाचे पडसाद

या कारवाईमुळे कळंगुट- बागा पट्ट्यातील बेकायदेशीर हालचालींना लगाम बसेल आणि पर्यटकांचा प्रवास अधिक सुखकर होईल. त्यामुळे पोलिसांनी किनारी भागात अशा तऱ्हेची कारवाई सातत्याने करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com