Dona Paula Jetty Bus Accident News
पणजी: दोनापावला जेटीच्या गेटला एका खासगी बसने ब्रेक निकामी झाल्यामुळे जोरदार धडक दिली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. यात गेट आणि बसच्या दर्शनी भागाची मोडतोड झाली आहे.
दोनापावला येथे ब्रेक निकामी झाल्यामुळे एका खासगी बसने आधा एका लाईटच्या खांबाला आणि त्यानंतर दोनापावला जेटीच्या गेटला जोरदार धडक दिली. ही घटना दि. 27 जानेवारी रोजी सकाळी घडली. सुदैवाने या परिसरात फारशी गर्दी नसल्याने तसेच बसमध्ये प्रवासी नसल्याने मोठा अनर्थ टळला.
हाती आलेल्या माहितीनुसार अचानक ब्रेक निकामी झाल्यामुळे बसचालकाने बसवरील नियंत्रण गमावले आणि बस थेट जेटीच्या गेटकडे झेपावली. जोराची धडक बसल्याने गेटचा काही भाग मोडला. त्याचबरोबर या खासगी बसच्या दर्शनी भागाचे नुकसान झाले आहे. या धडकेनंतर ही खासगी बस काही अंतर जाऊन थांबली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.