डॉम्‍निक गावकर यांचा ‘आप’ मध्‍ये प्रवेश Dainik Gomantak
गोवा

डॉम्‍निक गावकर यांचा ‘आप’ मध्‍ये प्रवेश

राय येथून तीनवेळा जिल्हा पंचायत सदस्य म्हणून निवडून आलेले ‘एसटी’ समाजाचे नेते डॉम्‍निक गावकर हे आज दिल्लीत ‘आप’मध्ये दाखल होणार आहेत.

दैनिक गोमन्तक

मडगाव: माजी उपमुख्‍यमंत्री दयानंद नार्वेकर यांच्यानंतर आता आम आदमी पक्षाच्या गळाला आणखी एक मोठा मासा लागला आहे. राय येथून तीनवेळा जिल्हा पंचायत सदस्य म्हणून निवडून आलेले ‘एसटी’ समाजाचे नेते डॉम्‍निक गावकर हे आज दिल्लीत ‘आप’मध्ये दाखल होणार आहेत.

आज मी दिल्लीतील एका कार्यक्रमात ‘आप’मध्ये प्रवेश करणार आहे. आगामी विधानसभा निवडणूक ‘आप’च्या उमेदवारीवर कुडतरीतून लढविणार, अशी माहिती गावकर यांनी ‘गोमन्तक’ला दिली. सासष्टीत कुंकळ्ळी, वेळ्ळी, बाणावली व नावेली या मतदारसंघांत ‘आप’ने प्रचाराचा धडाका लावला आहे. नुवे मतदारसंघातही प्रभावी उमेदवार मिळविण्यासाठी ‘आप’चा प्रयत्न असून यावेळी सासष्टी तालुक्यातील काँग्रेसचा प्रभाव कमी करण्यावर त्यांचा भर असेल.

यापूर्वी ‘आप’ने काँग्रेस आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांना आपल्या गोटात ओढण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, नंतर रेजिनाल्ड यांनी विचार बदलला. त्यामुळे त्यांनी आता डॉम्‍निक गावकर यांना आपल्याकडे ओढल्याने या मतदारसंघातील एसटी समाजाची मते ‘आप’कडे वळण्याची शक्यता आहे. तथापि, हा मोठा बदल काँग्रेससाठी मारक ठरू शकतो, असेही बोलले जात आहे.

‘आप’चे दिल्ली मॉडेल गोव्यातही लाभदायी : गावकर

आम आदमी पक्षात प्रवेश घेणारे डॉम्‍निक गावकर यांनी आपल्या पक्ष प्रवेशाबद्दल सांगताना सर्व धर्मातील लोकांना बरोबर घेऊन जाण्याची क्षमता फक्त आपमध्‍ये आहे. दिल्लीत अरविंद केजरीवाल यांनी प्रभावी कामगिरी केली, त्याने प्रभावित झाल्यामुळेच आपण पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्‍याचे सांगितले. मोफत पाणी, मोफत वीज, मोफत शिक्षण हा आपचा दिल्ली मॉडेल गोव्यातही फायदेशीर ठरेल असे ते म्हणाले. 2012 मध्ये आपण फक्त 15 दिवस प्रचार करूनही सात हजारापेक्षा जास्त मते घेतली. 2017 मध्ये ‘आप’ने कुडतरीत नवखा उमेदवार उभा करूनही त्याला 3 हजारापेक्षा अधिक मते पडली. 2017 च्या तुलनेत आता कुडतरीत आपचे कार्यकर्ते तीनपटींनी वाढले आहेत. त्यात आता आपल्या समर्थकांची भर पडली आहे. कुडतरीत आप अधिक बळकट झाला आहे असे त्यानी सांगितले.

मी यावेळी अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याची तयारी ठेवली होती. मात्र, ‘आप’च्या नेत्यांनी वारंवार संपर्क साधल्याने विचार बदलला. यापूर्वी मी तीनवेळा राय जिल्हा पंचायत मतदारसंघातून निवडून आलो आहे. एकवेळा माझी पत्नी निवडून आली आहे. येथील मतदारांशी माझा चांगला संबंध आहे. त्यामुळेच यंदा कुडतरीत परिवर्तन होण्याची शक्यता वाटते.

- डॉम्‍निक गावकर

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT