समुद्र किनारा gomantak digital team
गोवा

Bardez News : देशी-विदेशी पर्यटक परतीच्या वाटेवर

किनारे सामसूम : पावसाचे आगमन, समुद्रही खवळला; अनेक शॅक्स हटवले

गोमंतक ऑनलाईन टीम

बार्देश : जगप्रसिद्ध कळंगुट समुद्र किनाऱ्यावर देशी-विदेशी पर्यटकांनी गेल्या काही महिन्यांपासून गर्दी केली होती. गेल्या दोन दिवसांपासून पावसाने सुरुवात केली असून विदेशी पर्यटकांनी परतीची वाट धरली आहे.

मे महिन्याची सुट्टी घालवण्यासाठी गोव्यातील किनारी भागात देशी पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती. मुलांच्या शाळांना उन्हाळी सुटी होती. त्यामुळे आई-वडिलांनीही नोकरी-व्यवसायातून वेळ काढत दरवर्षीप्रमाणे मे महिन्याची सुट्टी गोव्यात येऊन घालवली. कळंगुट, बागा, हणजूण, कांदोळी या बार्देश तालुक्यातील किनाऱ्यांवर पर्यटक लाखोंच्या संख्येने उतरले होते. अजूनही काही किनाऱ्यांवर महाराष्ट्र, कर्नाटक या राज्यांतील पर्यटक येतात.

महाराष्ट्रातील एका पर्यटकाने सांगितले की, गोव्यातील लोक स्वभावाने खूप प्रेमळ असून सर्वांना चांगली वागणूक देतात. त्यामुळे गोवा हे आमचे आवडते पर्यटनस्थळ आहे. अनेक वर्षांपासून आम्ही सर्वत्र फिरायला जातो; पण गोव्यात आम्ही दरवर्षी न चुकता येतो.

म्हापसा बाजाराला पर्यटकांची भेट

देशी-विदेशी पर्यटक ज्यावेळी गोव्यात येतात, त्यावेळी ते उत्तर गोव्यातील म्हापशाच्या बाजाराला भेट दिल्याशिवाय जात नाहीत. या मार्केटमध्ये सर्व तऱ्हेच्या वस्तू मिळतात. त्या खरेदी करण्यासाठी हे पर्यटक आवर्जून येतात. त्यामुळे पर्यटकांची म्हापसा मार्केटमध्ये मोठी गर्दी झालेली असते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT