Bomb Blast Dainik Gomantak
गोवा

Bomb Blast: गावठी बॉम्बच्या स्फोटात कुत्रा मृत्युमुखी; लोकवस्तीजवळील घटनेमुळे भागात भीतीचे वातावरण

Bomb Blast: लोकवस्तीजवळील घटनेमुळे कासारपाल भागात भीती

दैनिक गोमन्तक

Bomb Blast In Goa:

तोंडात गावठी बॉम्बचा स्फोट झाल्याने एक पाळीव कुत्रा तडफडून मृत्युमुखी पडला. ही धक्कादायक घटना लाटंबार्से पंचायत क्षेत्रातील कासारपाल येथील एका वाड्याजवळ घडली. भर लोकवस्तीजवळ घडलेल्या या जीवघेण्या घटनेमुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रानडुकराची शिकार करण्यासाठी पेरलेला गावठी बॉम्ब कुत्र्याने तोंडात घेतल्याने ही घटना घडल्याचा संशय आहे. या प्रकारामुळे कासारपाल भागात गावठी बॉम्बचा वापर करून रानडुकरांची शिकार करण्यात येत असल्याचे स्पष्ट झाले असून, स्थानिकांमध्ये खळबळ माजली आहे.

पोलिसांनी याप्रकाराची दखल घेत मोठा अनर्थ घडण्यापूर्वी गावठी बॉम्ब पेरणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करावी, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात आली आहे.दरम्यान, याप्रकरणी कासारपाल येथील योगीता दशरथ तारी या महिलेने डिचोली पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

गावठी बॉम्बमुळे ‘सॅण्डी’ नामक पाळीव कुत्रा मृत्युमुखी पडल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. पुढील पोलिस तपास सुरू आहे.

लहान मुले सुदैवाने वाचली

सोमवारी सायंकाळी कासारपाल येथील लोकवस्तीजवळ कानठळ्या बसविणारा स्फोट झाला. घाबरलेल्या लोकांनी आवाजाच्या दिशेने धाव घेतली. त्यावेळी एक पाळीव कुत्रा मृत्युमुखी पडल्याचे आढळून आले.

कुत्र्याचा जबडा फुटला होता. ज्याठिकाणी गावठी बॉम्बचा स्फोट झाला, त्या परिसरात लहान मुले खेळत होती. सुदैवाने त्या ठिकाणी स्फोट न झाल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेमुळे स्थानिकांमध्ये खळबळ माजली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT