Mormugao Port: Dainik Gomantak
गोवा

Mormugao Port: मुरगाव बंदरातील धक्क्यांचा वापर आता जहाज दुरुस्तीसाठी

माल हाताळणीचा सोडला नाद : उत्पन्नासाठी वेगळा मार्ग

दैनिक गोमन्तक

Mormugao Port: मुरगाव बंदरात मालवाहतुकीचे धक्के विकसित करण्यासाठी खासगी गुंतवणूकदार पुढे येत नाहीत, हे स्पष्ट झाल्याने आता या बंदरातील धक्क्यांचा वापर जहाज दुरुस्तीसाठी करण्यात येणार आहे. या बंदरातील धक्का क्रमांक 9 आणि बार्जसाठी असलेल्या तीन धक्क्यांचा विकास जहाज दुरुस्ती उद्योगासाठी करण्याबाबत खासगी क्षेत्रातील एका जहाजोद्योग कंपनीने रस दाखवला आहे.

गोवा शिपयार्ड आणि ही कंपनी मिळून हा नवा जहाज दुरुस्तीचा व्यवसाय सुरू करण्याची शक्यता पडताळून पाहिली जात असल्याची खात्रिलायक माहिती मिळाली आहे. खासगी कंपनीच्या माध्यमातून ही गुंतवणूक करण्यात येणार आहे. मुरगाव बंदर प्राधिकरण आणि गोवा शिपयार्ड यांच्यामध्ये धक्का क्रमांक 9 ची 250 मीटर लांबीची जागा देण्या-घेण्याविषयी चर्चा झाली, असे सांगण्यात येत आहे. बार्ज धक्क्यांची जागा खासगी जहाजोद्योग कंपनीला दिली जाणार आहे.

सध्या मोठ्या जहाजांची दुरुस्ती करण्याची सोय आपल्या देशाच्या किनारी भागात नसल्याने आखातात किंवा श्रीलंकेत अशी जहाजे न्यावी लागतात. ती सोय या बंदरात करण्याचा विचार सुरू झाला आहे. त्या खासगी कंपनीकडे 25 जहाजे आहेत. शिवाय त्यांच्याकडे तेलवाहू जहाजे आहेत. आंतरराष्ट्रीय नियमानुसार दर तीन वर्षांनी सुक्या गोदीत नेऊन ती दुरुस्त करावी लागतात. त्यामुळे त्यांनी या प्रस्तावात रस दाखवल्याची माहिती मिळाली आहे.

900 कोटींची गुंतवणूक शक्य

याआधी हे धक्के माल हाताळणीसाठी विकसित करण्यासाठी गुंतवणूकदारांकडून देकार मागवण्यात आले होते. त्याला जराही प्रतिसाद न मिळाल्याने आता या धक्क्यांचा वापर जहाज दुरुस्तीसाठी करण्याचा विचार पुढे आला आहे. ही योजना पुढे सरकली तर कॅनडातील एका कंपनीकडून 900 कोटी रुपयांची गुंतवणूक या जहाज दुरुस्ती उद्योगात होण्याची शक्यता आहे.

...तरीही माल हाताळणीत वृद्धी

धक्के विकसित करण्यासाठी गुंतवणूकदार पुढे येत नसले तरी मुरगाव बंदरात होणाऱ्या माल हाताळणीत या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत वाढ झालेली आहे. पहिल्या तिमाहीत 9.92 टन माल हाताळणी झाली आहे, ती गेल्या वर्षीच्या या तिमाहीच्या तुलनेत 3.34 टक्के जास्त आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT