Goa Border Dainik Gomantak
गोवा

गोव्याच्या सीमा खुल्या करण्यापूर्वी कोविड चाचणीची सोय करा

काँग्रेसची मागणी: खनिज वाहतूक बंद ठेवा

दैनिक गोमन्तक

मडगाव: गोव्यात (Goa) कोविडचे (Covid) रुग्ण कमी होत आहे. याच पार्श्वभूमीवर गोवा सरकार (Government) राज्याच्या सीमा (Border) परराज्यातील लोकांना खुल्या करू पाहत असल्याच्या पार्श्वभूमीवर आधी सीमांवर सुसज्ज अशी कोविड चाचणी केंद्रे सुरू करा आणि नंतरच सीमा खुल्या करा, अशी मागणी काँग्रेसने (Congress) मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) यांच्याकडे केली आहे.

काँग्रेस प्रदेश समितीचे उपाध्यक्ष संकल्प आमोणकर आणि सरचिटणीस जना भंडारी यांनी मुख्यमंत्री आणि इतर संबंधितांना याबाबतीत पत्र लिहून जर सरकारने घाईघाईने कोणताही निर्णय घेतला, तर काँग्रेस त्याला विरोध करेल, असे म्हटले आहे.

गोव्यात 31 जुलैपर्यंत सर्वांना कोविडची एक लस देण्याचे उद्दिष्ट पूर्ण होऊ शकलेले नाही तसेच केरळमध्ये कोविड रुग्ण वाढत आहेत या पार्श्वभूमीवर सीमा खुल्या करण्याची घाई नको, असे त्यांनी म्हटले आहे. गोव्यात कोविडचा प्रसार होऊ नये यासाठी कसिनो, खनिज वाहतूक, कोळसा वाहतूक यासारखे उपक्रम बंद ठेवावेत, तसेच सध्या प्राधान्यक्रम नसलेले प्रकल्प बंद ठेवून तो पैसा राज्यातील इस्पितळे सुसज्ज करण्यासाठी व वैद्यकीय सुविधा वाढविण्यासाठी करावा असे म्हटले आहे.

कोविड, तौक्ते वादळ आणि नुकताच आलेला पूर यामुळे ज्या कुणाला आर्थिक झळ बसलेली आहे, त्यांना मदत करण्यासाठी राज्यात आपत्ती निवारण निधी स्थापन करून मदत करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT