Diwali 2023 Sal Dainik Gomantak
गोवा

Diwali 2023 : साळ येथे पाडव्याच्या संध्याकाळी दीपोत्सव

Diwali 2023 : उपस्थित महिलांनी श्री भूमिका मंदिरात पणत्या पेटवून दीपोत्सवाला सुरुवात केली.

गोमन्तक डिजिटल टीम

Diwali 2023 : साळ येथील श्री महादेव भूमिका पंचायतन देवस्थानच्या श्री भूमिका देवीच्या मंदिरात व प्रांगणात दीपोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. श्री महादेव भूमिका देवस्थान समिती सदस्य व गावातील महिला मोठ्या संख्येने सहभागी होत्या.

दीपोत्सवाची संकल्पना दिलीप देसाई यांनी देवस्थान व उपस्थित ग्रामस्थांसमोर ठेवली , त्यास अनुमती देत हा दीपोत्सव उपस्थितांच्या साक्षीने व साळ येथील महिलांच्या सहकार्याने साजरा करण्यात आला.

पुरोहित यशवंत गाडगीळ , देवस्थान समितीचे सहसचिव पांडुरंग कृष्णा परब , महाजन उत्तम राऊत , पंढरीनाथ राऊत, देविदास ( पिंटो ) राऊत अर्जुन परब, दिलीप देसाई व उपस्थित महिलांनी श्री भूमिका मंदिरात पणत्या पेटवून दीपोत्सवाला सुरुवात केली.

तर नंतर भूमिका मंदिराच्या प्रांगणात विशिष्ट आकाराने उपस्थित महिलांनी पणत्या प्रज्वलित हा दीपोत्सव साजरा करण्यात आला. या दीपोत्सवात खालचावाडा, मधलावाडा, न्यूवाडा , वरचा वाडा येथील महिला उपस्थित होत्या. देवस्थानचे अध्यक्ष कालिदास राऊत व सचिव विशाल परब यांनी आभार मानले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT