Goa Tourism Dainik Gomantak
गोवा

Goa Tourism: चर्च, बीचेस हाऊसफुल! गोव्याकडे देशी पर्यटकांचा ओघ; पणजीच्या रस्त्यांवर गर्दी

Diwali holiday Goa: गोव्यात सर्वाधिक पर्यटकांची संख्या ही देशातील विविध राज्यांतून येणाऱ्यांची असते. विदेशी पर्यटकांची संख्या यावर्षी वाढण्याची शक्यता आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: शाळांना दिवाळीची सुट्टी असल्याने महाराष्ट्रासह इतर राज्यांतील पर्यटक गोव्यात दाखल झाले आहेत. विशेषतः कुटुंब, समूहाने येणारे पर्यटक अधिकतर दिसत आहेत. देशी पर्यटकांचा पणजीत आल्यानंतर सध्या ओढा आहे, तो चर्च स्क्वेअर, मळा आणि फोन्तेईन्हास भागातील जुन्या पोर्तुगीजकालीन घरांच्यामधील रस्त्यावरून छायाचित्रे काढण्यासाठी.

गोव्यात सर्वाधिक पर्यटकांची संख्या ही देशातील विविध राज्यांतून येणाऱ्यांची असते. विदेशी पर्यटकांची संख्या यावर्षी वाढण्याची शक्यता आहे. रशिया व इतर देशांतून गोव्याकडे पर्यटक येतील, अशी आशा पर्यटन खात्याला आहे.

मात्र, देशी पर्यटकांमध्ये गोव्याचे आकर्षण असल्याने एकदा तरी गोव्याला भेट देण्याच्या निमित्ताने पर्यटक येत आहेत. अगदी बिहार ते केरळ आणि पुद्दुचेरीपासून पर्यटक स्वतःच्या वाहनाने गोव्यात पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी येत असल्याचे दिसते.

पणजीत सध्या उशिरापर्यंत पर्यटक रस्त्यावर दिसत आहेत. मागील काही वर्षांत पणजीतील व्यवहाराची परिभाषाच बदलून गेली आहे. राजधानी पणजीला लागून असलेल्या मांडवी नदीतील कॅसिनोंचाही चाहता पर्यटक वर्ग अनेक राज्यांत आहे. कॅसिनोंचे आकर्षण असल्याने त्यानिमित्ताने सुट्टीची मजा लुटण्यासाठी येणारा पर्यटक वर्गही पाहायला मिळतो.

अनेक जाहिरातींमध्ये गोवा दाखवायचा झाल्यास सध्या पणजीतील चर्च स्क्वेअर, मळा परिसर दाखविला जातो, त्यामुळे गोव्यात येणारा पर्यटक याठिकाणी भेट देतोच. मागील काही वर्षांत सिंघम चित्रपटामुळे दोनापावला हे ठिकाण प्रसिद्ध झाले होते; पण आता पणजीत येणारा पर्यटक चर्च स्क्वेअर आणि मळा परिसरात येऊन जातोच.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colavale Jail Brawl: कोलवाळ जेलमध्ये राडा; 8 ते 10 कैद्यांकडून अंडर ट्रायल कैद्याला लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण

Viral Video: रेल्वे स्टेशनवर 'बेल्ट वॉर'! वंदे भारतमधील IRCTC कर्मचाऱ्यांची तुंबळ हाणामारी, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

IND vs AUS 3rd ODI: सिडनी वनडेत कोणाला संधी, कोणाला डच्चू? मालिका वाचवण्यासाठी टीम इंडियाच्या Playing 11 मध्ये होणार मोठे बदल

माजी खाणपट्टाधारकांना खनिज विक्रीस परवानगी; गोवा सरकारचा डंप पॉलिसीअंतर्गत महत्वाचा निर्णय

सात दिवसानंतर चौथा बळी; रासई लोटली स्फोटात जखमी बिहारच्या कामागाराचा मृत्यू

SCROLL FOR NEXT