Turtle  Dainik Gomantak
गोवा

World Wildlife Day 2023 : थोडे थांबा.. आम्हाला जन्मू द्या! कासवांची आर्त हाक

यंदा किनाऱ्यांवर तब्बल दहा हजार पिल्ले वाढताहेत

अनिल पाटील

World Wildlife Day 2023 : समुद्रकिनाऱ्यावरील अमर्याद मानवी हस्तक्षेप, धिंगाणा, रात्रभर कर्णकर्कश आवाज, डोळे दीपवणारे आणि शेकडो दूर फेकल्या जाणाऱ्या फ्लडलाईट्‌स यामुळे सध्या आम्ही त्रस्त आहोत. थोडे थांबा...आम्हाला जन्मू द्या.

मग तुमचे पर्यटन आहेच की. कारण शेकडो किलोमीटरवरून आलेल्या आईला आम्हाला भेटायचे आहे. आमच्यासाठी थोडी कळ काढा. ही आर्त हाक आहे, राज्याच्या किनारपट्टीवर अंड्यांत वाढत असलेल्या हजारो कासवांच्या पिल्लांची.

 जगभरात समुद्रकासवांच्या सात प्रजाती आढळून येतात. लेदर बॅक, हिरवी कासवे, हॉक्सबिल, लॉंगरहेड, ऑलिव्ह रिडले, केम्पचे रिडले, फ्लॅटबॅक. या 7 प्रजातींपैकी 6 प्रजाती जागतिक संघटनेकडून संकटग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आल्या आहेत. म्हणूनच आपल्याकडील ऑलिव्ह रिडले कासवांना वन्यजीव संरक्षण कायदा 1972 नुसार संरक्षण शेड्युल यादीमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे.

यातील काही कासवे 10-12 हजार किलोमीटरचे स्थलांतर करतात. ती वजनांनाही 800 ते 1000 किलोपर्यंत वाढतात आणि 100 वर्षांपेक्षा जास्त काळ जगतात. तरीही काही कारणांनी यातील काही जाती अतिसंकटग्रस्त बनल्या आहेत.

यापैकी ऑलिव्ह रिडले जातीची कासवे अंडी घालण्यासाठी हजारो वर्षांपासून देशाच्या पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीवर येतात. आपल्या राज्यातही ही कासवे येण्याची परंपरा जुनीच आहे.

तळपण, गालजीबाग, अगोंद, आश्वे, मोरजी, मांद्रे या किनाऱ्यांवर हे प्रमाण जास्त आहे. पूर्वी त्यांचा नित्यक्रम नैसर्गिक नियमाप्रमाणे सुरू होता. मात्र अलीकडच्या तीस वर्षांमध्ये किनाऱ्यावर बेसुमार हस्तक्षेप सुरू आहेत. संरक्षित जागेमध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटन चालते किनाऱ्यावरच्या शॅकचे अतिक्रमण समुद्रात गेले आहे.

ज्या भागांमध्ये ही कासवे अंडी घालतात त्या भागांमध्येही हा मानवी धुडगूस - धिंगाणा सुरू आहे. त्याच्या संरक्षणासाठी वन खात्याचे प्रयत्न सुरूच आहेत. त्याची आता न्यायालयालाही दखल घ्यावी लागत आहे. इथपर्यंत हे प्रमाण वाढले आहे.

सध्या उत्तर गोव्यात 39 कासवांनी 4 हजार 290 अंडी दिली आहेत. तर दक्षिण गोव्यात 50 कासवांनी तब्बल 5 हजार 182 अंडी दिली आहेत. ही सर्व अंडी सध्या वन खात्याच्या निगराणीमध्ये किनाऱ्यावर नैसर्गिकदृष्ट्या ठेवली आहेत.

सध्या या अंड्यांतून पिल्लांची वाढ होत आहे. अंडी घालण्यासाठी ही कासवे हजारो किलोमीटरचा प्रवास करत त्याच ठिकाणी येतात. कासवे अंडी घातल्यानंतर लगेच पुन्हा समुद्रात निघून जातात.

साधारणपणे 48 ते 52 दिवसांमध्ये या अंड्यांमधून पिल्ले बाहेर येतात. ही पिल्ले अत्यंत नाजूक असल्याने त्यांच्यावर अनैसर्गिक बाबींचा मोठा परिणाम होतो. यासाठीच कासव संरक्षित जागांमधील मानवी हस्तक्षेप थांबला पाहिजे.  

कासवांची वैशिष्ट्ये

केम्पच्या रिडलेनंतरचे ऑलिव्ह रिडले दुसरे सर्वात लहान कासव आहे. ऑलिव्ह रिडले कासवांचे वजन ७५ ते १०० पौंड (३४ ते ४५ किलो) आणि लांबी दोन ते अडीच फूटपर्यंत पोहोचते. त्यांच्या फिकट हिरव्या रंगाच्या कॅरॅपेससाठी त्यांना हे नाव देण्यात आले आहे.

सध्या समुद्री कासवांच्या प्रजातींपैकी सर्वात जास्त आहेत. ऑलिव्ह रिडलेचे घरटे ‘अरिबाडा’ म्हणून ओळखले जाते. १५ वर्षांत ती प्रौढ होतात.

ऑलिव्ह रिडलेंसमोरील धोके

मानवी वापरासाठी कासव आणि अंडी यांचा वापर, व्यावसायिक मासेमारी, गियरमध्ये कासवांना अडकवणे, किनारी विकास,  पिल्ले वाचण्याचे प्रमाण अत्यल्प,  नैसर्गिक शिकार, अधिवास धोक्यात, वाढते प्रदूषण, जलमार्गांचा मोठा वापर असे अनेक धोके आहेत.

काय खातात ही कासवे ?

ऑलिव्ह रिडले सर्वभक्षी असतात. खेकडे, कोळंबी, लॉबस्टर, अर्चिन, जेली, शैवाल आणि मासे यासह विविध प्रकारचे शिकार ते खातात. त्यांच्या खाण्यात जेली आणि शेवाळ जास्त असल्याने समुद्र स्वच्छतेमध्ये त्यांचा मोठा वाटा आहे.

बाजा कॅलिफोर्निया, मेक्सिकोमध्ये त्यांचे आवडते शिकार लाल खेकडा आहे, जे ऑफशोअर पाण्यात मुबलक आहे. ही प्रजाती आययूसीएन रेड लिस्टद्वारे असुरक्षित मानली जाते आणि यूएसमध्ये धोकादायक म्हणून सूचीबद्ध आहे. इतर कासवांच्या तुलनेत ती मोठ्या प्रमाणात असली तरी १९६० च्या दशकापासून त्यांची संख्या अंदाजे ५० टक्क्यांनी कमी झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vijay Deverakonda Accident: मोठी दुर्घटना टळली! विजय देवरकोंडाचा कार अपघात, अज्ञात वाहनाने मागून दिली जोरदार धडक VIDEO

IND vs WI: दुसऱ्या कसोटीत जडेजा रचणार इतिहास! कपिल देवच्या 'खास क्लब'मध्ये एंट्रीची नामी संधी; कराव्या लागणार फक्त 'इतक्या' धावा

Viral Video: शाळेला दांडी मारुन रस्त्यावर 'आशिकी'! दोन मुलींसोबत रोमान्स करणाऱ्या पठ्ठ्याचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, 'अशा सडकछाप आशिकांनीच...'

Coldrif Cough Syrup Bans: मुलांचा बळी घेणाऱ्या 'त्या' जीवघेण्या कफ सिरपवर गोव्यात बंदी, 'FDA'कडून आदेश जारी

IND vs PAK मॅचमधील 'या' घटनेनंतर पाकिस्तानी खेळाडू अडचणीत, ICC च्या नियमांचं उल्लंघन करणं पडलं भारी; काय घडलं नेमकं?

SCROLL FOR NEXT