Horoscope
HoroscopeDainik Gomantak

Raja Mantri Predictions: 2026 मध्ये गुरु 'राजा' तर मंगळ 'मंत्री'! नवीन वर्ष जगात आणि देशात काय मोठे बदल घडवणार?

Astrology 2026 Forecast: गुरुवारचा स्वामी देवगुरु बृहस्पती (गुरु) असल्यामुळे 2026 मध्ये गुरु हा 'राजा' असेल, तर मंगळ मंत्र्याची भूमिका पार पाडेल.
Published on

Astrology 2026 Forecast: ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून 2026 हे वर्ष अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. हिंदू पंचांगानुसार, या नव्या वर्षाची सुरुवात गुरुवारपासून होत आहे. गुरुवारचा स्वामी देवगुरु बृहस्पती (गुरु) असल्यामुळे 2026 मध्ये गुरु हा 'राजा' असेल, तर मंगळ मंत्र्याची भूमिका पार पाडेल. ग्रहांचे हे परिवर्तन केवळ पंचांगापुरते मर्यादित राहत नाही, तर याचा मोठा परिणाम सामाजिक, आर्थिक, आणि मानसिक ऊर्जा स्तरांवर होतो, असे मानले जाते. गुरुचे हे वर्ष जगात सकारात्मक बदल घडवून आणेल की मंगळाची ऊर्जा नवीन आव्हाने निर्माण करेल.

गुरु बनणार 'राजा': वाढणार अध्यात्मिक ऊर्जा

गुरु हा धर्म, ज्ञान, करुणा, सदाचार आणि समृद्धीचे प्रतीक मानला जातो. जेव्हा एखाद्या वर्षावर गुरुचे शासन असते, तेव्हा वातावरणात सकारात्मकता वाढते. 2026 मध्ये अध्यात्मिकतेत वाढ होण्याची शक्यता आहे. लोक पूजा-पाठ, ध्यान, योग आणि धार्मिक यात्रांकडे अधिक आकर्षित होतील. समाज आणि कुटुंबात दान-धर्म आणि नैतिकतेबद्दलचा दृष्टिकोन वाढू शकतो.

2026 चे हिंदू नववर्ष 19 मार्चपासून (विक्रम संवत 2083) सुरु होईल. गुरुवारपासून सुरुवात होत असल्यामुळे धार्मिक स्थळांवर भाविकांची गर्दी वाढू शकते. शिक्षण आणि संशोधनाच्या क्षेत्रातही मोठे आणि सकारात्मक बदल संभवतात. विद्यार्थ्यांमध्ये एकाग्रता आणि लक्ष्य गाठण्याची ऊर्जा वाढेल. नवीन शोध, नवीन कल्पना आणि नवीन धोरणांवर वेगाने काम होण्याची शक्यता आहे.

 Horoscope
Horoscope: भाग्य जोरात! प्रयत्नांना दुप्पट यश, पैशाचे मार्ग खुले; 'या' राशीसाठी आजचा दिवस 'सर्वोत्तम'

मंगळ असेल 'मंत्री': आव्हाने आणि संघर्ष

मंगळ हा ऊर्जा, साहस, जोश आणि संघर्षाचा कारक ग्रह आहे. जेव्हा मंगळ ग्रहाला मंत्रिपदाची जबाबदारी मिळते, तेव्हा सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ माजू शकते. 2026 मध्ये देश-विदेशातील काही क्षेत्रांमध्ये तणाव किंवा मतभेद वाढताना दिसू शकतात. कायदेशीर वाद, मोठे आंदोलन आणि सरकारांमध्ये मतभेद किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर तणाव वाढण्याची शक्यता आहे. मंगळाच्या प्रभावामुळे लोकांना अधिक साहसी आणि उत्साही बनवेल, पण यामुळे काही ठिकाणी संघर्ष होण्याची शक्यता आहे.

 Horoscope
Horoscope: भाग्य तुमच्या बाजूने! पैशाची वाढ, कामाचे कौतुक, प्रेमसंबंधात आनंद; वाचा तुमच्या राशीचे भविष्य

कसे असेल आर्थिक आणि व्यापार क्षेत्र?

गुरुचा प्रभाव अर्थव्यवस्थेला स्थिरता देतो. त्यामुळे 2026 मध्ये विकास दर हळू असेल, पण तो स्थायी असेल. यावर्षी सोने-चांदीसारख्या धातूंच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. मंगळाचा परिणाम सायबर सुरक्षेवर दिसू शकतो. ऑनलाइन फसवणूक, हॅकिंग आणि तांत्रिक धोक्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. गुंतवणूक आणि वडिलोपार्जित संपत्तीच्या प्रकरणांमध्ये सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. 2026 मध्ये रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात. टेक सेक्टरमध्ये गती येऊ शकते. सरकार व्यापार-संबंधित नवीन नियम बनवू शकते. आंतरराष्ट्रीय स्तरावर ट्रेड वॉर किंवा आयात-निर्यातीच्या धोरणांवरुन तणावाची स्थिती निर्माण होऊ शकते.

 Horoscope
Horoscope: भावनिक स्थैर्य, आर्थिक बाबतीत सुधारणा; तरीही निर्णय घेताना घाई करू नका!

2026 वर्षाचे भविष्य

एकंदरीत, 2026 हे वर्ष अध्यात्मिक, ज्ञानवर्धक आणि परिवर्तनकारी सिद्ध होईल. जिथे गुरु सकारात्मकता, समृद्धी आणि शिक्षणाला मजबूत करेल, तिथे मंगळाची ऊर्जा गतिमानता आणि आव्हानांच्या रुपात समोर येईल. योग्य संतुलन राखून पुढे गेल्यास हे वर्ष नवीन संधींनी परिपूर्ण ठरु शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com