नवदुर्गा मंडळ साहित्याचे वाटप करताना Dainik Gomantak
गोवा

Goa: घोटेली नवदुर्गा उत्सव मंडळातर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

यंदा घोटेलीतील (Ghoteli) शाळेत 34 विद्यार्थी तर धनगरवाडा येथील 43 विद्यार्थ्यांना या शैक्षणिक साहित्याचा लाभ घेतल्याचे सांगण्यात आले आहे.

दैनिक गोमन्तक

पर्ये: घोटेली 2, केरी सत्तरी (Ghoteli 2, Keri sattari) गोवा येथील श्री सार्वजनिक नवदुर्गा उत्सव मंडळातर्फे घोटेली 2 व धनगरवाडा (dhangar wada ) येथील सरकारी प्राथमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना पुस्तके व इतर शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. दरवर्षी प्रमाणे यंदाही हे वाटप करण्यात आले आहे. नवदुर्गा मंडळ आपली समाजाप्रती असलेली सामाजिक बांधिलकी जोपासत हे साहित्याचे वाटप करीत आहे. (Distribution of educational materials to students by Ghoteli Navdurga Utsav Mandal)

दरम्यान याचे वाटप त्या - त्या शाळांनी केले. यात घोटेली 2 येथे झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात श्री नवदुर्गा उत्सव मंडळाचे अध्यक्ष बाबली गावस ( babali gawas ) यांच्या हस्ते विद्यालयाच्या मुख्याध्यापिका आस्था नाईक( astha naik ) यांच्याकडे तर धनगरवाडा येथे विद्यालयाचे मुख्याध्यापक नारायण शेटये ( narayan shetye ) यांच्याकडे हे शैक्षणिक साहित्य सुपूर्द करण्यात आले. यावेळी त्या त्या शाळांतील काही पालकवर्गही उपस्थित होते. यावेळी मंडळाचे सचिव आदित्य गावस, माजी अध्यक्ष लक्ष्मण गावस, सदस्य तुळशीदास गावस, संतोष गावस, नारायण पडवळकर आदी मंडळी उपस्थित होते.

यावेळी धनगरवाडा येथील कार्यक्रमात बोलताना लक्ष्मण गावस यांनी श्री नवदुर्गा उत्सव मंडळाच्या सामाजिक योगदानाची माहिती दिली तसेच या दोन्ही विद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हे वाटप करीत असल्याचे सांगितले. इथल्या बहुतेक पालकांनी आपल्या मुलांना गावातील शाळेत शिकवत असल्याने गावातील शाळा वाचवल्याबद्दल पालकांचे कौतुक केले. यंदा घोटेलीतील शाळेत 34 विद्यार्थी तर धनगरवाडा येथील 43 विद्यार्थ्यांना या शैक्षणिक साहित्याचा लाभ झाला आहे असे त्यांनी सांगितले. यावेळी नारायण शेटये यांनी मंडळाच्या या उपक्रमाबद्दल नवदुर्गा मंडळाचे आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार सचिव आदित्य गावस यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT