Mahadayi Water Dispute Dainik Gomantak
गोवा

Mahadayi Water Dispute: म्‍हादई प्रश्नी गठीत सभागृह समितीचे हसे होण्यापूर्वी ती बरखास्त करा; विजय सरदेसाई

Mahadayi Water Dispute: गोव्‍याची जीवनदायिनी असलेली म्‍हादई नदी वाचविण्‍यासाठी गोवा सरकारने मोठा गाजावाजा करुन सभागृह समितीची स्‍थापना केली होती.

Pramod Yadav

Mahadayi Water Dispute

गोव्‍याची जीवनदायिनी असलेली म्‍हादई नदी वाचविण्‍यासाठी गोवा सरकारने मोठा गाजावाजा करुन सभागृह समितीची स्‍थापना केली होती.

मात्र गेल्‍या वर्षभरात या समितीची एकही बैठक झालेली नाही याकडे गोवा फॉरवर्डचे अध्‍यक्ष विजय सरदेसाई यांनी लक्ष वेधताना गोवा सरकारला जर कर्नाटकचीच चिंता वाटत असेल तर ही समिती अस्‍तित्‍वात ठेवता तरी कशाला? असा सवाल करीत तिचे पूर्ण हसे होण्‍यापूर्वीच ती बरखास्‍त करा असा सल्‍ला मुख्‍यमंत्री प्रमोद सावंत यांना दिला आहे.

या समितीची एकमेव बैठक फेब्रुवारी 2023 मध्‍ये झाली हाेती. त्‍यानंतर या समितीची एकही बैठक झालेली नाही. आणि लोकसभा निवडणूक आता तोंडावर आलेली असताना नजीकच्‍या काळात ही बैठक घेतली जाणार नाही हे स्‍पष्‍ट आहे असे सरदेसाई म्‍हणाले.

या प्रश्र्‍नी चालढकल करण्‍याचे भाजप सरकारचे मुख्‍य प्रयोजन म्‍हणजे, या सरकारला गोव्‍याच्‍या जीवनदायिनीपेक्षा लोकसभेच्‍या कर्नाटक राज्‍यातील 21 जागा अधिक महत्‍वाच्‍या आहेत.

त्‍यामुळे म्‍हादईचा बळी गेला तरी हरकत नाही पण कर्नाटकच्‍या भाजपला त्‍याचा त्रास होऊ नये एवढीच गोवा सरकारची इच्‍छा आहे असे वाटते असे सरदेसाई यांनी म्‍हटले आहे.

म्‍हादईचा प्रश्न मी विधानसभेतही चर्चेत आणला होता. त्‍यावेळी कर्नाटकचे हित जपण्‍यासाठी गोव्‍यातील भाजप सरकार म्‍हादईचा बळी देऊ पहात आहे का असा संशयही व्‍यक्‍त केला होता. आज हा संशय खरा ठरण्‍याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

गोवा सरकारने उच्‍च न्‍यायालयात म्‍हादई संदर्भात फक्‍त एक आव्‍हान याचिका दाखल केलेली आहे. जीची सुनावणी वारंवार तहकूब केली जाते.

आता ही केस ऑगस्‍ट महिन्‍यात सुनावणीस येणार आहे. असे असतानाही सरकार आम्‍ही योग्‍यवेळी निर्णय घेऊ असे म्‍हणते. वेळ जाणे हेच या सरकारसाठी योग्‍य वेळ आहे का असा सवाल सरदेसाई यांनी केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Monsoon Trip Goa: मान्सूनमध्ये गोव्यात कुठली 'ऑफबीट' ठिकाणं एक्सप्लोर कराल? वाचा खास टिप्स

Rashi Bhavishya 04 July 2025: प्रवासाचे योग, सामाजिक मान मिळेल; महत्वाची व्यक्ती भेटेल

Acid Attack Goa: 'त्याच्या' आईनेच आत्महत्येस प्रवृत्त केलं... अ‍ॅसिड हल्ल्याप्रकरणी मृत मुलीच्या आईचा खळबळजनक आरोप

E-Sakal: ई-सकाळची गरुडझेप! पुन्हा ठरले देशातील नंबर 1 मराठी न्यूज पोर्टल

Vijai Sardesai: 'आत्ताच्या हुकूमशाहीपेक्षा पोर्तुगीज परवडले'; विजय सरदेसाईंचा भाजप सरकारला टोला

SCROLL FOR NEXT