Prabhav Nayak Dainik Gomantak
गोवा

South Goa District Hospital: 'लाल फिती'च्या कारभारामुळे रुग्णांची परवड, आरोग्यमंत्र्यांनी तात्काळ दखल घ्यावी; नायक यांची मागणी

Prabhav Nayak: दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयाकडे सध्या फक्त २ रुग्णवाहिका आहेत. या रुग्णवाहिका हृदयविकाराच्या आणि नवजात बालकांच्या रुग्णांसाठी दिल्या वापरल्या जात आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

रुग्ण नोंदणी, रुग्णवाहिकांची कमतरता, रुग्णांकडून ऑनलाइन पेमेंट न स्वीकारणे आणि बेडची कमतरता या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी हॉस्पिसियो दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र बोरकर यांची भेट घेतली. "लाल फितीचा" कारभार हेच सर्व इस्पितळाच्या सर्व समस्यांचे कारण आहे, असे माझे ठाम मत आहे. आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी याची त्वरित दखल घेऊन परिस्थिती सुरळीत करावी, अशी मागणी युवा नेते प्रभव नायक यांनी केली आहे.

वैद्यकीय अधीक्षकांसोबत झालेल्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना नायक यांनी मी काही सूचना केल्या असून रुग्णांच्या अडचणी कमी करण्यासाठी त्यांची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन वैद्यकीय अधीक्षकांनी दिले आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयाकडे सध्या फक्त २ रुग्णवाहिका आहेत. या रुग्णवाहिका हृदयविकाराच्या आणि नवजात बालकांच्या रुग्णांसाठी दिल्या वापरल्या जात आहेत. अपघाती रुग्णांसह इतर सर्व रुग्णांना १०८ रुग्णवाहिकेद्वारेच नेले जाते. आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी ताबडतोब दोन रुग्णवाहिका देण्याचे तसेच इतर काहीजणांनी अशाच रुग्णवाहिका देण्याचे जाहीर केले होते, परंतु आतापर्यंत एकही नवीन रुग्णवाहिका इस्पितळाकडे आलेली नसल्याचे समजते, असे नायक यांनी नमूद केले.

वैद्यकीय अधीक्षकांनी मला ओपीडीमध्ये सुरू असलेली व्यवस्था समजावून सांगितली. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, दिव्यांग व्यक्ती, गर्भवती महिलांना ओपीडीमध्ये थेट प्रवेश दिला जातो. ज्येष्ठ नागरिक आणि इतर रुग्णांसाठी बसण्यासाठी लॉबीमध्ये जवळपास ३०० खुर्च्या उपलब्ध आहेत. रुग्ण आणि नातेवाईक तपासणी होणार नाही का या चिंतेने घाबरून गर्दी करतात. यावर तोडगा काढण्यासाठी इस्पितळ प्रशासनाकडून दखल घेतली जाईल असे त्यांनी सांगितले. दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळ पूर्णपणे कार्यांवित व्हावे यासाठी तसेच सदर इस्पितळाला टर्शियरी इस्पितळ म्हणून मान्यता मिळावी यासाठी सर्वांच्या सहकार्याने मी सरकार दरबारी पाठपुरावा करीत राहीन, असे नायक यांनी सांगितले.

ऑनलाइन किंवा डिजिटल पेमेंटबाबत निर्णय

दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात रुग्णांकडून ऑनलाइन किंवा डिजिटल पेमेंट स्वीकारले जात नाही, ही धक्कादायक बाब आहे. आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी तातडीने फाइल क्लिअर करून ऑनलाइन पेमेंट सुविधा सुरू करावी, अशी मागणी प्रभव नायक यांनी केली.

१५० खाटांची गरज

हॉस्पिसिओ हॉस्पिटलमध्ये खाटांच्या तीव्र टंचाईमुळे वैद्यकीय कर्मचाऱ्यांना येणाऱ्या अडचणी मला समजल्या आहेत. आता फक्त ३५० खाटा आहेत आणि सुमारे १५० खाटांची तातडीची गरज आहे. त्याच बरोबर आवश्यक मनुष्यबळ देणे सरकारचे कर्तव्य आहे, असे प्रभव नायक यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa History: 1380 ते 1470 मध्ये संपूर्ण गोव्याची भरभराट झाली; विजयनगरचा प्रतापी सम्राट देवराय

Australian Open 2026: नव्या युगाची नांदी, 'अल्काराज' ठरला टेनिसचा नवा किंग! नोवाक जोकोविचचा पराभव करुन पटकावलं पहिलं ऑस्ट्रेलियन ओपन जेतेपद VIDEO

Balochistan Violence: दमन आणि अत्याचाराचा पाकड्यांचा इतिहास...! बलुचिस्तानमधील हिंसाचारावरुन चिखलफेक करणाऱ्यांना भारताचं चोख प्रत्युत्तर

Budh Gochar 2026: फेब्रुवारीत बुध ग्रहाची 'ट्रिपल चाल' पालटणार नशीब! 'या' 3 राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ; व्यापाऱ्यांसाठी आनंदाची बातमी

Illegal Beef Trafficing: चोर्ला घाटात मध्यरात्री थरार! पाच गायींच्या मांसासह दोन तस्कर पोलिसांच्या जाळ्यात; 20 वर्षीय तरुणाला बेड्या

SCROLL FOR NEXT