उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूर विधानसभा निवडणुकीत 2022 मध्ये भाजपने पंजाब वगळता इतर चार राज्यांमध्ये पुन्हा एकदा सत्ता स्थापन केली आहे. उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांना पक्षाने मुख्यमंत्री म्हणून आधीच प्रोजेक्ट केले होते, परंतु गोवा (Goa), उत्तराखंडमध्ये मुख्यमंत्रीपदाची शर्यत खूपच चुरशीची दिसत होती. पुष्कर सिंग धामी पक्षाला विजय मिळवून देण्यात यशस्वी ठरले, परंतु त्यांना त्यांची जागा गमवावी लागली. (Disclosure of BJP's strategy behind the decision in Goa and Uttarakhand)
दुसरीकडे गोव्यात प्रमोद सावंत (Dr Pramod Sawant) हे पक्षाचा चेहरा होते, परंतु तिथेही चुरशीची स्पर्धा होती. मात्र, पक्षाच्या निर्णयावर नजर टाकली, तर यूपी, उत्तराखंड (Uttarakhand), मणिपूर आणि गोवा या चार राज्यांतील चार मुख्यमंत्र्यांपैकी एकालाही हटवण्यात आलेले नाही. त्यांना कायम ठेवण्यात आले आहे. जोपर्यंत निकाल समाधानकारक आहे, तोपर्यंत अनावश्यक बदल टाळले जातात, अशा पद्धतीने राजकीय विश्लेषक विश्लेषण करत आहेत.
दरम्यान, निवडणुकीत पुष्कर सिंग धामी (Uttarakhand Chief Minister Pushkar Singh Dhami) यांचा वैयक्तिक पराभव पक्षाने बाजूला सारला आहे. सोमवारी त्यांची उत्तराखंडच्या मुख्यमंत्रिपदासाठी निवड करण्यात आली. तर गोव्यात सहकारी विश्वजित राणे (Vishwajit Rane) यांची मुख्यमंत्री पदाची महत्त्वाकांक्षा असूनही प्रमोद सावंत यांच्या गळ्यात पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची माळ पडली. दुसरीकडे, धामी यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदासाठी मान्यता देणे हे भाजपच्या उत्तराखंड युनिटमधील गटबाजीला रोखण्याचा प्रयत्न म्हणून पाहिले जात आहे. कारण आधीच्या भाजप राजवटीचे नेतृत्व प्रथम त्रिवेंद्रसिंग रावत, नंतर तीरथसिंग रावत यांनी केले होते. परंतु आता पुष्करसिंग धामी यांच्या खांद्यावर मुख्यमंत्री पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
शिवाय, उत्तराखंडच्या राजकारणाने गेल्या चार वर्षांत तीन मुख्यमंत्री पाहिले आहेत. अशा स्थितीत धामींच्या रुपाने भाजप राज्यात स्थिरतेला महत्त्व देताना दिसत आहे. आता मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर, राज्याचे सर्वात तरुण मुख्यमंत्री, 46 वर्षीय पुष्कर सिंह धामी यांना सहा महिन्यांत पोटनिवडणूक जिंकावी लागणार आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.