Margao Scrap Vehicles Machinery Dainik Gomantak
गोवा

Margao: मडगावात भंगार वाहनांचा प्रश्न ऐरणीवर! लिलाव करण्याची मागणी; राज्यातील आकडेवारीकडे लक्ष देण्याची गरज

Margao Scrap Vehicles Machinery: रस्त्यावरील लोकांनी टाकून दिलेली वाहने मध्यंतरी उचलली जात होती. सरकारने स्वतःची भंगार वाहने व मशिनरीचा लिलाव करावा अशी मागणी आता नागरिक करू लागले आहेत.

Sameer Panditrao

सासष्टी: मडगावात प्रत्येक सरकारी कचेऱ्यांच्या परिसरात भंगारात आलेली अनेक वाहने व मशिनरी गेल्या १५ ते २० वर्षांपासून धूळ खात पडलेली आहेत. काही वाहनांवर माती साचलेली आहे तर काही वाहने व मशिनरी झाडा झुडुपांत रुतलेली आहेत.

रस्त्यावरील लोकांनी टाकून दिलेली वाहने मध्यंतरी उचलली जात होती. सरकारने स्वतःची भंगार वाहने व मशिनरीचा लिलाव करावा अशी मागणी आता नागरिक करू लागले आहेत.

मडगावमधील नागरिक दिनेश काकोडकर यांनी सांगितले की, जलस्रोत, सार्वजनिक बांधकाम, वीज, वाहतूक, पर्यटन, नगरपालिका या सरकारी खात्याच्या कचेऱ्यांच्या आजूबाजूला नजर टाकली तर कित्येक गाड्या अशा पडून असलेल्या दिसतात. मडगावातच अशी ५० ते ६० वाहने आहेत. या वाहनांचा लिलाव केला तर त्यातून सरकारच्या तिजोरीत थोडातरी पैसा जमा होईल. तसेच जागा रिकामी होईल व पार्किंगसाठी जागा उपलब्ध होईल, असे काकोडकर यांनी सांगितले.

राज्यात हजारो वाहने पडून

संपूर्ण गोव्यात अशी भंगार झालेली हजारो वाहने असतील असे काकोडकर यांचे म्हणणे आहे. सरकारचे याकडे लक्ष जात नाही तेव्हा आमच्यासारख्या लोकांना ते सरकारच्या लक्षात आणून द्यावे लागते, असेही काकोडकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"माझी पत्नीही ओरडायला लागली..."; वैभव सूर्यवंशीला संघातून बाहेर, दिग्गज खेळाडूचा टीम इंडियाच्या मॅनेजमेंटवर पारा चढला...

Smartphones Under 20000: 20 हजारांच्या आत धांसू 5G फोन! मोठी बॅटरी, AMOLED डिस्प्ले आणि जबरदस्त कॅमेरा; पाहा 5 बेस्ट पर्याय

नियम पाळा नाहीतर गाशा गुंडाळा! मुलांच्या ऑनलाईन सुरक्षेवर सरकारचा मास्टरस्ट्रोक; इंस्टाग्राम अन् फेसबुकवर करडी नजर

DA Hike 2026: ऑक्टोबर महिन्यात धमाका! नवरात्र-दिवाळीआधी 50 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोदी सरकार देणार मोठं गिफ्ट; महागाई भत्त्यात 4 टक्के वाढीचा जॅकपॉट

Houthi Missile Attack Saudi Arabia: मध्य पूर्वेत महायुद्धाचा भडका! हूतींच्या ड्रोन-मिसाईल हल्ल्याने पुन्हा हादरला सौदी अरेबिया; 3 शहरांमध्ये इमर्जन्सी जाहीर

SCROLL FOR NEXT