CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Goa Disaster Management: 'सचेत' मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; आपत्ती व्यवस्थापनाची तयारी पूर्ण : मुख्यमंत्री

Goa Disaster Management: आपत्तीची पूर्व चेतावणी प्रसार प्रणाली यंत्रणा (ईडब्ल्यूडीएस) ही बीएसएनएलच्या मदतीने कार्यान्वित करण्यात आली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पावसाळ्यात आपत्तीसंदर्भात वेळोवेळी माहिती देणारा 'सचेत' पोर्टल अ‍ॅप तसेच राष्ट्रीय आपत्ती सतर्कता पोर्टल किंवा मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड प्रत्येकाने करावा. आपत्ती व्यवस्थापनाचे जिल्हा व तालुकावार नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत.

आपत्तीची पूर्व चेतावणी प्रसार प्रणाली यंत्रणा (ईडब्ल्यूडीएस) ही बीएसएनएलच्या मदतीने कार्यान्वित करण्यात आली आहे. पावसाळ्यातील आपत्तीला सामोरे जाण्यासाठी आपत्ती व्यवस्थानाची पूर्ण तयारी होत आली आहे, अशी माहिती मान्सूनपूर्व आपत्ती व्यवस्थापनाची बैठक आज मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी घेतल्यानंतर पत्रकार परिषदेत माहिती दिली.

सचिवालयात राज्य आपत्ती व्यवस्थापनाची बैठक मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी विविध खात्याचे प्रमुख, नौदल, रेल्वे, तटरक्षक, बीएसएनएल यांचेही अधिकारी उपस्थित होते.

सरकारने आपत्ती व्यवस्थापनसंदर्भात घ्यावयाची खबरदारी घेतली आहे. त्यामुळे हे अ‍ॅप डाऊनलोड करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pilots Dope Test: वैमानिकांची आता वर्षातून एकदा होणार 'डोप टेस्ट'! DGCA लागू करणार नवा नियम; जाणून घ्या काय आहे नवा प्लॅन?

Headland Sada: पोस्ट खात्याची सदनिका बनली शेळ्यांचा निवारा! वर्षानुवर्षे दुर्लक्षामुळे सरकारी इमारत जीर्ण; भंगारवाल्याचाही शिरकाव

Lucky Zodiac Signs 2026: बुधाचे मघा नक्षत्रात गोचर! 'या' लकी राशींवर होणार पैशांचा पाऊस, रक्षाबंधनापर्यंत जॅकपॉट

Colvale Electricity Bills: कोलवाळात वीज बिले दुप्पट-तिप्पट! ग्राहकांना 17 हजारांपर्यंत बिलांचा फटका, फेरपडताळणीची मागणी

Tarun Tejpal Case: तरुण तेजपालला सुप्रीम कोर्टाचा दणका! अधिक वेळ देण्याची याचिका फेटाळली; दोन आठवड्यांत आत्मसमर्पणाचे निर्देश

SCROLL FOR NEXT