Goa Panchayat Election Dainik Gomantak
गोवा

Goa Panchayat Election : पंचायत निवडणुकीत प्रस्थापितांचा भ्रमनिरास, नव्यांना पसंती

पंचायत निवडणूक : बहुतांश ठिकाणी भाजपचे वर्चस्व, विरोधकांकडून टीकास्त्र सुरूच

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी, ता. १२ (खास प्रतिनिधी) :  राज्यातील १८६ पंचायतींच्या १,४६४ प्रभागांसाठीची मतमोजणी आज शुक्रवारी पार पडली. सर्वज जागांचे निकाल स्पष्ट झाले असून ग्रामीण भागातील पंचायतींमध्ये नव्या चेहऱ्यांना पसंती मिळाल्याचे चित्र आहे. अनेक प्रस्थापित आणि त्यांच्या समर्थकांना जनतेने झिडकारले असून त्या ठिकाणी नव्या चेहऱ्यांना पंच म्हणून पसंती दिली आहे. याशिवाय विद्यमान मंत्री, आमदार आणि नेत्यांनाही काही ठिकाणी झटके देऊन जनतेने सर्व काही अलबेल नसल्याचे अप्रत्यक्षरित्या इशारा दिला आहे.

राज्यातील 191 पैकी 186 पंचायतींच्या निवडणुकीसाठी 10 ऑगस्ट रोजी मतदान झाले होते. या पंचायतींच्या 1528 प्रभागांपैकी 64 उमेदवार यापूर्वीच निवडून आल्याने 1464 जागांसाठी मतमोजणी संबंधित तालुक्यांच्या ठिकाणी पार पडली. यासाठी 5038 उमेदवार रिंगणात होते.

मतमोजणीनंतर काही अनपेक्षित निकाल समोर आले. अनेक ठिकाणी नवे चेहरे निवडून आल्याने प्रस्थापितांचा भ्रमनिरास झाला. दुसरीकडे निकालात कमी पडूनही आत्मपरिक्षण करण्याऐवजी विरोधकांनी भाजपवर टीकास्त्र सुरूच ठेवले आहे. तर निकाल जाहीर होताच अनेक अपक्ष, काही विरोधी उमेदवारांनीही भाजपकडे धाव घेतली.

राज्यातील आचारसंहिता मागे

आयोगाने पंचायत निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू केली होती. शुक्रवारी सर्व 186 पंचायतींची निवडणूक प्रक्रिया संपल्याने आचारसंहिता मागे घेत असल्याचे जाहीर आयोगाने केले आहे. आचारसंहितेमुळे अडकून राहिलेली विकासकामे यापुढे सुरू होतील.

कळंगुटमध्ये लोबोंना नाकारले

प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या कळंगुट पंचायतीत भाजप नेते जोसेफ सिक्वेरा यांनी पुनरागमन केले. त्यांनी काँग्रेस आ. मायकल लोबोंच्या गटाला दणका देत 7 उमेदवार निवडून आणले. तर लोबो गटाचे तीन उमेदवार विजयी झाले.

  • साळगाव, चिखली, बांबोळी, उसकई-पालये येथे उमेदवारांना समान मते मिळाल्याने टॉस करून, चिठ्ठीद्वारे निकाल जाहीर

  • वेलिंग- प्रियोळमध्ये मंत्री गोविंद गावडे यांचे निर्विवाद वर्चस्व. गावडे यांचे 11 पैकी 9 उमेदवार विजयी.

  • नेत्रावळी पंचायतीमधून तृणमूलच्या नेत्या राखी नाईक प्रभुदेसाई विजयी.

  • चिखली पंचायतीमध्ये कमलाप्रसाद यादव आणि त्यांची पत्नी सुनिता यादव विजयी.

  • सभापती रमेश तवडकर यांच्या पत्नी सविता तवडकर या पैंगीण पंचायतीमधून विजयी.

  • रुमडामळ पंचायतीमध्ये गोवा फॉरवर्डचे समर्थक उमरान पठाण यांच्याकडून भाजप प्रवक्ते उर्फान मुल्ला पराभूत.

  • मडकईमध्ये मगोला दणका, मगोचा पाठिंबा असलेले 9 पैकी 4 जण विजयी, तर 5 अपक्ष विजयी.

  • चर्चिल आलेमाव यांची मुलगी शेरॉन डिकॉस्ता वार्का पंचायतीतून विजयी.

  • चारवेळा सरपंच, सहावेळा पंच असलेल्या मार्था साल्ढाणा कासावली पंचायतीमधून पराभूत.

  • सांकवाळमधून रमाकांत बोरकर हे मारिलियो कार्व्हालो यांच्याकडून पराभूत

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PSI Recruitment Goa: महिला 'पीएसआय' भरतीत मोठी गळती, उमेदवार नाराज; 216 पैकी केवळ 13 उमेदवार पात्र, नियम बदलाचा फटका

British Nationals Death In Goa: एक महिन्यात कांदोळीत तीन ब्रिटिश नागरिकांचा मृत्यू

Bank Loan: 181 कोटींची कर्जे थकित, बँकांकडून पाच वर्षांत घेतली 43,103 कोटींची कर्जे

E Challan Cyber Fraud: बनावट 'ई-चलन', सायबर भामट्यांचा नवा सापळा! वाहतूक विभागाकडून सतर्क राहण्याचे आवाहन

Fishing Boat Missing: भरकटलेल्या मच्छिमारांचा अखेर 12 तासांनंतर शोध, चारही जण सुखरूप तळपण जेटीवर

SCROLL FOR NEXT