Dando Lake: वेळसावच्या दांडो तळ्यातील पाण्यासंबंधी गावामध्ये दोन गट पडले आहेत. तळ्याचे पाणी दूषित झाल्याने आसपासच्या रहिवाशांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची भीती असल्याचा दावा एका गटाने केला. तथापि गेली अनेक वर्षे त्या तळयात पाणी साचते. कोणाच्याही आरोग्यावर परिणाम झालेला नाही. तसेच त्या तळ्यात मोठ्या प्रमाणात मासे मिळतात असल्याने तळे काहीजणांच्या उपजिविकाचे साधन झाल्याचा दावा दुसऱ्या गटाने केला आहे.
दांडो तळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने पूरसद्दश्य परिस्थिती निर्माण झाल्याचा दावा स्थानिक रहिवाशांनी केला. आम्ही वेळसांवच्या सरपंच डायाना यांना सदर तळ्यातील पाणी सोडण्यासाठी साकवाची दारे उघडावीत अशी मागणी केली होती. पण ती मान्य झालेली नाही. सरपंचाची काहीजण दिशाभूल करीत असल्याचे रहिवाशांनी सांगितले. तेथील पाणी दूषित झाल्याने पाण्याला वास येत आहे. तसेच तिथे डासांची उत्पती झाल्याने काहीजण आजारी पडल्याचा दावा त्यांनी केला.
मात्र रहिवासी एलिस्टन पिंटो हे दिशाभूल करीत असल्याचा दावा तेथील बहुसंख्या नागरिकांनी केला आहे. पाणी समुद्रात जाण्यासाठी तिथे दारे आहेत, ती पावसाळ्यात उघडी करण्यात येतात असे त्यांनी सांगितले. या तळ्यात मोठ्या प्रमाणात मासे मिळत असल्याने आम्ही ते पाणी अडविले आहे. तेथील मासे पकडून आम्ही विकतो.
जेणेकरून आमचा उदरनिर्वाह होतो. या तळ्याचे वैशिष्ट म्हणजे उन्हाळ्यात तळे पाण्याने भरते. या तळ्यात गाळ साचला आहे. तो गाळ काढला तर आम्हाला फायदा होऊ शकतो असे त्यांनी स्पष्ट केले.
गोंयच्या रापणकारांचो एकवोटचे आग्नेलो रॉड्रिग्ज यांनी सदर तळ्यात पाणी वाढण्यामागील कारण स्पष्ट केले. रेल्वेने दुपदरीकरणासाठी या तळ्यातील पाण्याची वाट बंद केल्याने पाणी वाढले आहे. पिंटो व इतर काहीजण दुपदरीकरणाला पाठिंबा देत आहेत. त्यांना या तळ्यातील पाणी सोडलेले हवे.
जेणेकरून रेल्वेला तेथे काम करता येईल, असा दावा रॉड्रिग्ज यांनी केला. या तळ्यातील पाणी सोडले तर त्या पाण्याबरोबर मोठ्या प्रमाणात मासे समुद्रात जाण्याची भीती आहे. ते मासे समुद्रात गेले तर लोकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्र्न निर्माण होईल असे ते म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.