Disabled children in goa Dainik Gomantak
गोवा

अपंगत्वामुळे मुलांनीच दूर लोटले !

व्हिडीओमुळे प्रशासन जागे : कामुर्लीच्या दिव्यांग शोभनाची व्यथा

दैनिक गोमन्तक

योगेश मिराशी

म्हापसा: दिव्यांग असल्याने कुटुंबातील सदस्य देखभाल करीत नाहीत. परिणामी, घरात एकटेच राहावे लागते. शिवाय घरात शौचालयाचा अभाव, त्यात दुखापतीमुळे गुडघ्याखालून दोन्ही पाय कापावे लागल्याने सध्या हलाखीचे जीवन जगणाऱ्या कामुर्ली येथील शोभना शिवा कोरगावकर (56) यांच्या घरास अखेर गोवा राज्य दिव्यांगजन आयोगाने भेट दिली. शोभना कोरगावकर यांचा दोन दिवसांपूर्वी एक व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होताच, राज्य प्रशासन खडबडून जागे झाले.

(Disabled children in goa)

आयुक्तांनी शोभना यांच्या स्थितीचा आढावा घेतला आणि त्यांना प्रशासनाकडून योग्य मदत केली जाईल, असे आश्वासन दिले. याशिवाय रविवारी त्यांच्यासाठी एका व्हिलचेअरची व्यवस्था करून दिली जाईल, असेही सांगितले.

पाच वर्षांपूर्वी शोभना कोरगावकर यांना आपले दोन्ही पाय गमवावे लागले. सुरवातीला उजव्या पायाला एक गंभीर दुखापत झाली होती, यात मधुमेहाचा त्रास असल्याने डॉक्टरांनी त्यांचा हा पाय गुडघ्याखालून कापला होता. कालांतराने त्याच्या डाव्या पायालाही दुखापत झाली आणि दुसरा पायही गुडघ्याखालून कापला गेला. हे अपंगत्व आल्याने घरच्या लोकांनी त्यांच्यापासून नाते तोडले. शिवाय पतीचेही निधन झाल्याने त्या एकट्याच या अपंगत्वाशी सामना करीत जीवन जगताहेत.

दरम्यान, शोभना कोरगावकर यांना मधुमेहाचा त्रास आहे. त्यामुळे त्यांना तपासणीसाठी आरोग्य केंद्रात जावे लागते. मात्र, गाडीचे पैसे नसल्याने त्या कधीकधी उपाचारासाठी ठरलेल्या दिवशी दवाखान्यात जात नाहीत, असेही शोभना कोरगावकर यांनी सांगितले.

आजवर उपेक्षाच !

विशेष म्हणजे, घरात शौचालय नसल्याने शोभना यांच्या समस्येत अधिकच भर पडली आहे. शेजारी विहिर असल्याने तिथे शौचालय बांधण्यास ना हरकत परवाना मिळत नाही, अशी कैफियत त्यांनी मांडली. याप्रश्नी पंचायतीसह स्थानिक प्रतिनिधींची कुठलीच मदत त्यांना आजवर मिळालेली नाही. अनेकदा त्यांनी या प्रतिनिधींचे उंबरे झिजवले, मात्र पदरी निराशाच पडल्याचे त्या सांगतात.

आईचा होता आधार !

वर्षभरापूर्वी माझ्या आईने निधन झाले. त्याच एकमेव माझा आधार होत्या. माझ्या काही अडचडणी किंवा मनातील गोष्टी मी तिच्याकडे मांडायची. मात्र, तिच्या निधनानंतर हक्काची अशी कुठलीच दुसरी व्यक्ती नाही. आईच्या आठवणीने रोज माझे डोळे पाणवतात. माझ्या मुलांनीही माझ्याकडे दुर्लक्ष केले. ते आपल्या संसारात रमले असून त्यांना स्वतःच्या आईची काळजी नाही, अशी खंत शोभना यांनी व्यक्त केली.

पेन्शनसह अन्य सर्व सुविधा पुरवू : गुरुप्रसाद पावसकर

शोभना यांना डीएसएस पेंशन मिळत नाही. त्यांचा हा अर्ज कुठे आहे, त्याची आम्ही माहिती घेऊ. त्यांच्याकडे या अर्जाची प्रतही नाही. खात्याकडे अर्ज पोहचला असल्यास प्रक्रिया पूर्ण करू अन्यथा नवीन अर्ज बनवू. ही सर्व कामे आमचे प्रतिनिधी त्यांच्या घरी येऊन करतील, असे दिव्यांगजन आयुक्त गुरुप्रसाद पावसकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Calangute: दारुच्या नशेत टाईट पर्यटकाचा कळंगुटमध्ये राडा; नग्न होऊन रस्त्यात झोपला, टॅक्सीवर उभारला

Rashi Bhavishya 23 November 2024: नोकरीत बढतीची संधी अन् बेरोजगारांनाही दिलासा... 'या' दोन राशींच्या लोकांचा विशेष दिवस!

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

SCROLL FOR NEXT