Akasa Airlines Pune To Goa Direct Flight Dainik Gomantak
गोवा

Flights To Goa: पुणे - गोवा प्रवास एक तासात, अकासा एअरलाईन्सने सुरु केली थेट विमानसेवा

गोव्यातील पर्यटन हंगाम सुरु असल्याने राज्यात देशी पर्यटकांचा ओघ वाढला आहे.

Pramod Yadav

Pune To Goa Direct Flight: प्रवाशांची वाढती मागणी लक्षता घेता अकासा एअरलाईन्सने पुणे ते गोवा थेट विमानसेवा सुरु केली आहे. यामुळे पुणे ते गोवा अंतर एका तासांत पूर्ण करणे शक्य होणार आहे.

गोव्यातील पर्यटन हंगाम सुरु असल्याने राज्यात देशी पर्यटकांचा ओघ वाढला असून, या विमानसेवाचे फायदा होणार आहे.

पुण्यातून सायंकाळी 5.35 वाजता ही फ्लाईट उड्डाण घेईल, एका तासांत हा प्रवास पूर्ण होईल आणि सायंकाळी 6.35 वाजता ही फ्लाईट गोव्यात दाखल होईल.

तर, गोव्यातून ही फ्लाईट दुपारी 3.45 वाजता उड्डाण घेईल आणि दुपारी 4.45 वाजता पुण्यात दाखल होईल.

दरम्यान, पुण्यातील विमानतळाच्या क्षमतेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. सकारात्मक चर्चेनंतर अतिरिक्त विमानसेवेला परवानगी देण्यात आली असली तरी विविध आव्हाने कायम आहेत.

पुणे विमानतळावरील सर्व उपलब्ध स्लॉट आधीच वाटप केले गेले आहेत. सध्याच्या क्षमतेत नवीन उड्डाण सेवा सामावून घेता येत नसल्यामुळे धावपट्टीचा विस्तार करण्याची गरज MCCIA चे अध्यक्ष सुधीर मेहता या व्यक्त केली.

विमानतळ विस्तारासाठी भागधारक आणि विमानतळ प्राधिकरण यांच्यात सहयोगी प्रयत्न सुरू आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News: ऐतिहासिक! 1972 पूर्वी अभयारण्यात आलेली, सर्व्हे आराखड्यावर नोंद असलेली एक लाख घरे कायदेशीर होणार, 1 ऑगस्टपासून प्रक्रिया

New Dress Code: हाफ-स्लीव्ह, लेगिंग्सला बंदी! भारताशेजारील 'या' देशात महिला-मुलींसाठी नवा ड्रेस कोड; तालिबानी फतवा जारी

Goa Assembly Session Live: स्थानिकांना डावलणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करा... आमदार चंद्रकांत शेट्ये यांची मागणी

Goa Murder Case: तलवारीने केला हल्ला, डिचोलीत पतीकडून पत्नीची हत्या

Karun Nair: लहान मुलासारखा रडला करुण नायर, केएल राहुलने दिला आधार, सोशल मीडियावर फोटो व्हायरल; नेमकं काय झालं?

SCROLL FOR NEXT