Flights To Goa Dainik Gomantak
गोवा

Flights To Goa: आता दिल्लीला जाण्याची गरज नाही; हिंडनवरून थेट गोव्याला विमानसेवा सुरु होणार

Flights To Goa: विमान हिंडन येथून सकाळी 10.00 वाजता टेकऑफ करून दुपारी 12.45 वाजता गोव्यात पोहोचेल.

Pramod Yadav

Flights To Goa

हिंडन विमानतळावरून गोवा, बेंगळुरू, चेन्नई आणि कोलकातासाठी लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार आहे. यासह, 180 आसनी एअरबस विमान देखील प्रथमच हिंडन येथून उड्डाण करेल. आतापर्यंत येथून फक्त 76 आणि त्यापेक्षा कमी आसनांची विमाने उड्डाण घेत होती.

हिंडन ते बंगळुरू 1 ऑगस्टपासून, गोवा आणि कोलकाता 12 ऑगस्टपासून आणि चेन्नईला 20 ऑगस्टपासून विमानसेवा सुरू होणार आहे. यामुळे गाझियाबाद आणि पश्चिम उत्तर प्रदेशातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

एअर इंडिया एक्सप्रेस चारही शहरांसाठी विमानसेवा सुरू करत आहे. हिंडन ते बेंगळुरू अशी दिवसातून दोन वेळा आणि उर्वरित तीन शहरांसाठी दररोज एक फ्लाइट असेल.

हिंडन विमानतळ प्राधिकरणाच्या संचालिका सरस्वती वेंकटरामन यांनी एका हिंदी वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार, कंपनीने चारही शहरांसाठी फ्लाइटचे बुकिंग सुरू केले आहे. नव्या विमानसेवेमुळे वेळेची बचत होण्याबरोबरच प्रवाशांची सोय होणार आहे. उड्डाणाची सर्व तयारी जवळपास पूर्ण झाली आहे, असे वेंकटरामन म्हणाल्या.

सध्या हिंडन ते नांदेड (महाराष्ट्र), आदमपूर (जालंधर), किशनगड (राजस्थान), लुधियाना आणि भटिंडा येथे विमानसेवा सुरू आहे.

दरम्यान, हिंडन ते चेन्नई ही सेवा 20 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. चेन्नईहून सकाळी 5.30 वाजता उड्डाण होईल आणि 830 वाजता हिंडनला पोहोचेल. परतताना हे विमान हिंडनहून सकाळी 9:00 वाजता उड्डाण करेल आणि दुपारी 12 वाजता चेन्नईला पोहोचेल. येथील तिकीट पाच हजारांपेक्षा कमी किमतीत मिळेल.

विमान हिंडन येथून सकाळी 10.00 वाजता टेकऑफ करून दुपारी 12.45 वाजता गोव्यात पोहोचेल आणि गोव्याहून दुपारी 1.15 वाजता परतीचा प्रवास सुरू होईल आणि दुपारी 3.55 वाजता विमान हिंडन येथे उतरेल. गोव्याचे तिकीट सुमारे पाच हजार रुपये असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: शुक्रवारचा दिवस ठरणार लाभदायक! 4 राशींना मिळणार यशाची नवी दिशा; कुटुंब, करिअर आणि आर्थिक क्षेत्रात सकारात्मक बदलांचे संकेत

Goa Drugs Case: काणकोणमध्ये अंमली पदार्थांवर कारवाई; 26.9 ग्रॅम चरससह हॉटेलच्या वेटरला अटक

Gold Rate: इराण शांतता करार ठरणार 'गेम चेंजर'! डॉलर घसरणार अन् सोन्याचा भाव गगनाला भिडणार; जे.पी. मॉर्गनचा 6000 डॉलर्सचा अंदाज

Aymen Hussein Story: आधी अल-कायदाने वडिलांना मारले, मग इसिसने भावाला पळवले! फिफा वर्ल्ड कपमध्ये इराकच्या अमीन हुसेनचा जगभर डंका

DR. Ram Manohar Lohia Journey: अकबरपूर ते बर्लिन अन् पुढे थेट गोव्याचा स्वातंत्र्यसंग्राम! डॉ. राममनोहर लोहियांच्या जागतिक जडणघडणीचा इतिहास

SCROLL FOR NEXT