Diocesan Schools Goa Dainik Gomantak
गोवा

Diocesan Schools Goa: डायोसेशन शाळांनी अध्यक्ष नेमावेत, दुसऱ्याच दिवशी थकीत वेतन देऊ! 458 शिक्षकांना मुख्यमंत्र्यांचे मोठे आश्वासन

Diocesan Schools Pending Salary Goa: डायोसेशन संस्‍थांच्‍या ९३९ शाळांतील ४५८ शिक्षकांचे वेतन प्रलंबित ठेवून सरकारने त्‍यांच्‍यावर अन्‍याय केला आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: ‘डायोसेशन संस्‍थांनी (अल्‍पसंख्‍याक शैक्षणिक संस्‍था) अध्‍यक्षांची नियुक्ती केल्‍यास आणि अध्‍यक्षांनी सही दिल्‍यास ९३९ शाळांतील ४५८ शिक्षकांचे प्रलंबित वेतन दुसऱ्या दिवशी देऊ, अशी हमी मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विरोधी आमदारांना दिली. आमदार विजय सरदेसाई यांनी हा प्रश्‍‍न उपस्‍थित केला होता.

विरोधकांनी हा विषय लक्षवेधी सूचनेसाठी मांडला होता. परंतु, त्‍याचा समावेश लक्षवेधी सूचनेत न करण्‍यात आल्‍याने विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी नाराजी व्‍यक्त केली. डायोसेशन संस्‍थांच्‍या ९३९ शाळांतील ४५८ शिक्षकांचे वेतन प्रलंबित ठेवून सरकारने त्‍यांच्‍यावर अन्‍याय केला आहे. या शिक्षकांचे वेतन लवकरात लवकर द्यावे, अशी मागणी सरदेसाई आणि युरी यांनी मुख्‍यमंत्र्यांकडे केली होती.

त्‍यावर उत्तर देताना, हा विषय सध्या न्यायप्रविष्ट आहे. सर्वोच्च न्यायालयात याला आव्हान देण्यात आले आहे. तसेच आमदार आलेक्स सिक्वेरा या विषयाचा सातत्याने पाठपुरावा करत आहेत. प्रकरण न्‍यायालयात असले तरी डायोसेशन संस्‍थांनी शाळेवर अध्‍यक्षांची नेमणूक केल्‍यास आणि अध्‍यक्षांनी सही दिल्‍यास सरकार दुसऱ्या दिवशी वेतन वितरित करेल, असे मुख्‍यमंत्री म्‍हणाले. त्‍यावर, अशा शाळांना अध्‍यक्ष किंवा समिती नेमणे न्‍यायालयाने बंधनकारक केलेले नाही. त्‍यामुळे त्‍यांना तत्‍काळ वेतन वितरित करावे, असे सरदेसाई म्‍हणाले.

दरम्‍यान, डायोसेशनप्रमाणेच इतर काही शाळांतील शिक्षकांचे वेतन प्रलंबित आहे. पूर्व प्राथमिक शिक्षकांचा प्रश्‍‍न मिटलेला नाही. व्‍यावसायिक शिक्षकांचे अनेक प्रश्‍‍न आहेत. त्‍यामुळेच आमच्‍या प्रश्‍‍नाचा लक्षवेधी सूचनेत समावेश करावा अशी मागणी केली होती, असे युरी आलेमाव म्‍हणाले. त्‍यावर, पुढील दोन दिवसांत या विषयावर चर्चा घडवून आणली जाईल, असे सभापती गावकर यांनी स्‍पष्‍ट केले.

अध्यक्षांची नियुक्ती करावीच लागेल

मंत्रिमंडळातील बाबूश मोन्‍सेरात यांच्‍यासह पाच मंत्री अशा काही शाळांच्या व्यवस्थापन समितीवर अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या सहीनेच अनुदान प्रक्रिया पूर्ण होत आहे. त्यामुळे डायोसेशन संस्थांच्या शाळांनीही अध्यक्षांची नियुक्ती केलीच पाहिजे. कारण तसे झाले तरच हा प्रश्‍‍न मार्गी लागू शकतो. त्‍या ४५८ शिक्षकांना वेतन मिळू शकते, असे मुख्‍यमंत्री सावंत यांनी नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Child Writer: 'गौरवी, असेच आणखी लिहीत जा'; 10 वर्षांच्या बाललेखिकेच्या 29 निबंधांना मुख्यमंत्र्यांची दाद, पहिल्या पुस्तकाचे प्रकाशन

Asian Games Final 2026: हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया रचणार इतिहास? फायनलसाठी भारताची ताकदवान फौज तयार; 'अशी' असणार संभाव्य प्लेइंग-11

Fire Case: आगीपूर्वी घराजवळ बादली घेऊन आलेला कोण? 2 मिनिटांत बादलीशिवाय परतला; दमोने कुटुंबातील सहा मृत्यूंच्या तपासाला नवे वळण

Santinez Footpath Damage: स्मार्ट सिटीच्या रस्त्यालगत खोदलेले पदपथ ‘जैसे थे’; जलवाहिनी जोडणी झाली, मात्र खड्डे न बुजवल्याने पादचाऱ्यांना धोका

Goa Crime: लग्नाचे आमिष दाखवून बलात्काराचा आरोप; 90 लाखांचे दागिने-रोकड घेतल्याप्रकरणी खटला सत्र न्यायालयाकडे वर्ग

SCROLL FOR NEXT