Russian Tourist Climbs Zuari Bridge Goa For Reel Dainik Gomantak
गोवा

Zuari Bridge: रशियन व्यक्तीला झुआरी पुलावरील स्टंट भोवणार; कंपनी दाखल करणार गुन्हा

Goa Police: झुआरी पूलाच्या देखभालीचे काम दिलीप बिल्डकॉन लि. कंपनी करत आहे. कंपनीने रशियन व्यक्तीच्या जीवघेण्या स्टंटची गंभीर दखल घेतली आहे.

Pramod Yadav

Zuari Bridge

मडगाव: रशियन व्यक्तीने नव्या झुआरी पुलावरील केलेला जीवघेणा स्टंट समाज माध्यामांवर चांगलाच व्हायरल झाला. या व्हिडिओची पुलाची देखभाल करणाऱ्या कंपनीकडून गंभीर दखल घेण्यात आलीय. कंपनी आता रशियन व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

उत्तर आणि दक्षिण गोव्याला जोडणारा नवा झुआरी पुलावर एक रशियन व्यक्तीने जीवघेणा स्टंट केल्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. या परदेशी व्यक्तीने कायद्याची तमा न बाळगता झुआरी पुलाच्या उंच खांबावर चढत जीव धोक्यात घातला तसेच, व्हिडिओ तयार करुन तो समाज माध्यमावर देखील प्रसिद्ध केला.

झुआरी पूलाच्या देखभालीचे काम दिलीप बिल्डकॉन लि. कंपनी करत आहे. कंपनीने या प्रकरणाची दखल घेतली असून, रशियन व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला जाणार आहे.

रशियन व्यक्तीने पूलाच्या उंच टोकावर जाण्याचे धाडस केले. या भागात सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आलेले नाहीत. कोणी अशा प्रकारचे धोकादायक काम करु शकते असा विचारच डोक्यात येत नाही, अशी माहिती कंपनीचे उपाध्यक्ष अतुल जोशी यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिली.

झुआरी पूलाचा तो खांब कोणाच्या हद्दीत?

झुआरी पुलावरील तो खांब कोणाच्या हद्दीत येतो याचा निर्णय झाल्यानंतर वेर्णा अथवा आगशी पोलिस स्थानकांमध्ये तक्रार दाखल केली जाईल. रशियन व्यक्तीच्या कारनाम्याचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत असून, नागरिक तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.

दरम्यान, या व्यक्तीविरोधात यापूर्वी देखील मुंबईत गुन्हा दाखल असल्याची माहिती आहे. वांद्रे-वरळी सी-लिंकवर अशाच प्रकारचा स्टंट केल्याने त्याच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आलीय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT