Observatory Tower & Viewing Gallery on New Zuari Bridge Goa 
गोवा

New Zuari Bridge: गोवा सरकारचे 270 कोटींचे कंत्राट मिळाले, कंपनीच्या शेअर्सला होणार फायदा

दिलीप बिल्डकॉनला मिळाले झुआरी पुलावरील ऑब्जर्व्हेटरी आणि व्ह्यूइंग गॅलरीच्या 270 कोटींचे कंत्राट

Pramod Yadav

Observatory Tower & Viewing Gallery on New Zuari Bridge Goa

दक्षिण आणि उत्तर गोव्याला जोडणाऱ्या नवीन झुआरी पुलाच्या दोन्ही बाजू खुल्या झाल्या आहेत. या केबल पुलामुळे प्रवासाच्या वेळेत मोठी बचत होत आहे. शिवाय पर्यटनात देखील भर पडली आहे.

नवीन झुआरी पुलावर ऑब्जर्व्हेटरी टॉवर आणि व्ह्यूइंग गॅलरी उभारली जाणार असल्याची घोषणा केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. या कामाच्या 270 कोटी रुपयांच्या कंत्राट दिलीप बिल्डकॉन लिमिटेडला मिळाले असून, लवकरच या कामाचा शुभारंभ होणार आहे. या कंत्राटामुळे दिलीप बिल्डकॉन कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिलीप बिल्डकॉन 60 महिन्यांत या प्रकल्पाचे काम पूर्ण करून गोवा सरकारकडे हस्तांतरित करेल. नवीन झुआरी पुलावर ऑब्जर्व्हेटरी टॉवर आणि व्ह्यूइंग गॅलरीतून पर्यटकांना सभोवतालच्या निसर्ग सौंदर्याचे आणि नदी व समुद्राचे विहंगम दृष्य पाहता येईल.

देशातील हा एकमेक प्रकल्प असून पूलाच्या सौंदर्यात भर पडेल, असे मंत्री नितीन गडकरी म्हणाले आहेत. गोव्यासारख्या पर्यटन राज्यात हा प्रकल्प अनेक पर्यटकांना आकर्षित करेल असाही विश्वास गडकरींनी व्यक्त केला होता.

दरम्यान, या प्रकल्पामुळे दिलीप बिल्डकॉन कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गोवा सरकारच्या PWD विभागाकडून नुकताच एक आदेश प्राप्त झाल्याची माहिती दिलीप बिल्डकॉन लिमिटेडने शेअर बाजाराला दिली आहे. 22 फेब्रुवारी रोजी प्राप्त झालेल्या या आदेशामुळे कंपनीला शेअर बाजारात फायदा होण्याची शक्यता आहे.

गेल्या 6 महिन्यांत दिलीप बिल्डकॉनच्या शेअर्सने 300 रुपयांवरून 53 टक्के परतावा देऊन 458 रुपयांची पातळी ओलांडली. एक वर्षाच्या कालावधीत, दिलीप बिल्डकॉनच्या समभागांनी 196 रुपयांच्या निम्न स्तरावरून गुंतवणूकदारांना 133 टक्के परतावा दिला आहे.

यापूर्वी, दिलीप बिल्डकॉन लिमिटेड मध्य प्रदेशच्या जलसंपदा विभागाच्या निविदेत 413 कोटी रुपयांचा प्रकल्प मिळाला.

दिलीप बिल्डकॉन लिमिटेडकडे 81,443 कोटी रुपयांची एकूण ऑर्डर आहेत. 2006 मध्ये स्थापित, दिलीप बिल्डकॉन ही एक पायाभूत सुविधा विकसित करणारी कंपनी आहे ज्यांच्या शेअर्सनी गुंतवणूकदारांना अल्प आणि दीर्घ मुदतीत मल्टी-बॅगर परतावा दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: लाखोंचा गंडा घालणाऱ्या 'दीपश्री'ला कोर्टाचा पुन्हा दणका; सुनावली 8 दिवसांची पोलिस कोठडी

Anmod Ghat: 17 तासानंतर अनमोड घाटातील कोंडी फुटली; बेळगाव-गोवा मार्ग वाहतुकीस खुला

वडाच्या झाडाखाली माडांच्या झावळ्यांचा मंडप, गोव्यात पार पडला प्रस्थापित रिवाजांना फाटा देणारा धनगरी लग्नसोहळा

स्थानिक टॅक्सी युनियनची दादागिरी; बीच भागात येणाऱ्या टॅक्सी चालकांवर हल्ला, गाडीची तोडफोड, असोसिएशनकडून तक्रार

Goa Today's Live News: महिलेच्या गळ्यातील लाखभर रुपयांचे मंगळसूत्र लंपास

SCROLL FOR NEXT