सासष्टी: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इतर राज्यांबरोबर गोव्याच्या विकासावर सदैव भर दिला आहे. पंतप्रधान मोदी यांच्या ११ वर्षांच्या कालावधीत कधी झाला नव्हता एवढा विकास गोव्याचा झाला.
गोव्यात ३० हजार कोटींहून अधिक रकमेची विकास कामे होऊ शकली आहेत, असे मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी आज सांगितले. मडगाव भाजप कार्यकर्त्यांसाठी विकसित भारताचा अमृतकाळ- सेवा, सुशासन, गरीब कल्याण यासाठी आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते.
माजी सभापती विश्वास सतर्क हे यावेळी उपस्थित होते. विरोधक डबल इंजिन सरकारावरुन टीका करीत असतात. या टीकेला बळी न पडता वस्तुस्थिती जाणून घ्या व मोदी सरकारने सेवा, सुशासन व गरीब कल्याण क्षेत्रात केलेला विकास व प्रगती लोकांपर्यंत पोहोचवा, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.
विश्वास सतर्क यांनी मोदी यांच्या ११ वर्षांचे प्रगती पुस्तक मांडले. या वेळी नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर, मडगाव भाजप मंडळ अध्यक्ष अभिषेक काकोडकर, सचिव योगिराज कामत, नगरसेवक उपस्थित होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.