MLA Digambar Kamat  Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: 'लोकांसाठी शांतपणे कार्यरत राहणे हे माझे धोरण'! मंत्री कामतांचे प्रतिपादन; खात्यांना न्याय देण्याचे दिले आश्वासन

Digambar Kamat: समाजातील असुरक्षित घटकांपर्यंत पोहोचणे हेच आपले पहिले प्राधान्य असेल. त्यामुळे सरकारची प्रतिमा उंचावेल आणि पक्षालाही त्याचा नक्कीच लाभ होईल, असे कामत म्हणाले.

Sameer Panditrao

सासष्टी: मी मुख्यमंत्रिपद भूषवलेले आहे. सर्व खाती हाताळली आहेत. त्यामुळे आता माझ्याकडे कोणते खाते आहे किंवा मंत्रिमंडळात मी कोणत्या क्रमांकावर आहे, याला काहीही महत्त्व नाही. मला मिळालेल्या खात्यांना शंभर टक्के न्याय देणे, हेच माझे ध्येय असेल, अशा शब्दांत सार्वजनिक बांधकाम खात्याचे नवनियुक्त मंत्री दिगंबर कामत यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

कामत सोमवारी अथवा बुधवारी सचिवालयात जाऊन मंत्रिपदाचा ताबा घेणार आहेत. ताबा घेतल्यावर खात्यांच्या कामाचा तातडीने आढावा घेऊन कृती आराखडा तयार केला जाईल. “समाजातील असुरक्षित घटकांपर्यंत पोहोचणे हेच आपले पहिले प्राधान्य असेल. त्यामुळे सरकारची प्रतिमा उंचावेल आणि पक्षालाही त्याचा नक्कीच लाभ होईल,” असे कामत म्हणाले.

मडगावमधील कोमुनिदाद इमारतीच्या नूतनीकरणाच्या कामाचा वेगाने पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. या कामाची निविदा पूर्वी काढली असली तरी कंत्राटदाराने काम सोडल्याने अडथळा निर्माण झाला होता. आता पुन्हा निविदा काढून काम सुरू केले जाईल. जुन्या व असुरक्षित इमारतींच्या प्रश्नावर जिल्हाधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली बैठक बोलावून इमारत मालक व भाडेकरूंना सहभागी करून योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

नगरपालिका इमारतीचे नूतनीकरण जीसुडाकडे सोपवले असून शहरातील काही भागांचे सौंदर्यीकरणाचे काम सुरू आहे. याशिवाय सोनसोडो कचरा प्रकल्पात दहा टन क्षमतेची मिश्र कचरा प्रक्रिया सुविधा उभारली जाणार असल्याची माहितीही कामत यांनी दिली.

टीकेकडे दुर्लक्ष

राजकीय विरोधकांकडून होत असलेल्या सततच्या टीकेबाबत विचारले असता कामत म्हणाले, लोकशाहीत टीका होणे स्वाभाविक आहे. मात्र मी त्याकडे कधी गांभीर्याने पाहत नाही, ना त्याला उत्तर देतो. लोकांच्या कामासाठी शांतपणे कार्यरत राहणे हेच माझे धोरण आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kodar IIT Project: 'कोडारमध्‍ये आयआयटी प्रकल्‍प आणून दाखवाच", 'आरजी'चा इशारा; कार्यकर्त्यांचा गावात मोर्चा

प्रकल्पांविरोधात वज्रमूठ! नैसर्गिक जलस्रोत, शेतीसाठी चिंबलवासीय एकवटले; युनिटी मॉल, प्रशासकीय स्तंभास विरोध

Goa Crime: बायणात महिलेचा गळा चिरून खून, कारण अस्‍पष्‍ट; घटनेनंतर खुनी तेथेच बसला होता आरामात

Abhishek Sharma: 'गुरु' वर 'शिष्य' पडला भारी! अभिषेक शर्मानं मोडला युवराजचा विश्वविक्रम, पाकिस्तानविरुद्ध 'इतक्या' चेंडूत झळकावलं अर्धशतक

Rama Kankonkar Assault: अट्टल गुन्‍हेगार जेनिटोच्‍या मुसक्‍या आवळल्‍या, संशयितांना दिली होती हल्ल्याची सुपारी; चौकशीअंती 'मास्‍टरमाईंड' येणार समोर

SCROLL FOR NEXT