Digambar Kamat  Dainik Gomantak
गोवा

कथित खाण घोटाळ्याचा लोकलेखा अहवाल सार्वजनिक करा : दिगंबर कामत

दैनिक गोमन्तक

मडगाव : आज भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा गोव्यात आले आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या गोव्यात येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत 2011 मध्ये तत्कालीन विरोधी पक्षनेत्यांनी नमूद केलेल्या खाण व्यवसायातील 35000 कोटींच्या घोटाळ्याचा उल्लेख असलेला लोकलेखा समितीचा अहवाल प्रसिद्ध करण्याची भाजपला संधी आहे. (Digambar Kamat Demanded To Make Public The Public Account Report Of The Mining Scam)

भाजपने सदर अहवाल लोकांसमोर ठेवावा असे उघड आव्हान विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत (Digambar Kamat) यांनी दिले आहे. दिगंबर कामत यांनी या संदर्भात सोशल मिडियावर पोस्ट टाकून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Chief Minister Dr. Pramod Sawant) यांना आव्हान केले आहे की तत्कालीन विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर (Manohar Parrikar) यांनी केलेले खाण घोटाळ्याचे गंभीर आरोप आता सदर पीएसी अहवाल सादर करून स्पष्ट करावेत. काँग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर (Girish Chodankar) यांनी काही दिवसांमागे सदर अहवाल जनतेसमोर ठेवावा अशी भाजप सरकारकडे मागणी केली होती. ती मागणी आता पूर्ण करावी असे दिगंबर कामत यांनी म्हटले आहे.

सदर लोकलेखा समितीचा अहवाल कधीही अस्तित्त्वात नव्हता आणि तथाकथित रु. 35000 कोटींचा खाण घोटाळा म्हणजे भाजपची फसवेगिरी व खोटारडेपणा होता असे दिगंबर कामत यांनी म्हटले आहे. माझा देवावर विश्वास असुन सत्य कधिच लपत नाही. भाजप याबाबत आता तरी काही तथ्ये आणि आकडेवारी लोकांसमोर ठेवेल अशी अपेक्षा बाळगतो असे दिगंबर कामत यांनी म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT