Srinivas Dhempe on Interim Budget 2024-25
Srinivas Dhempe on Interim Budget 2024-25  Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: धेंपेंचे फुटबॉलप्रेम ख्रिस्‍ती मते खेचणार

दैनिक गोमन्तक

Goa Politics:

सुशांत कुंकळयेकर

मडगाव, ता. २३ : पल्‍लवी धेंपे हे नाव जरी दक्षिण गोव्‍याला आणि सासष्टीला नवीन असले तरी ‘धेंपो’ हे नाव नवीन नाही. या नावाबद्दल ख्रिस्‍ती मतदारांमध्‍येही मोठ्या प्रमाणावर ममत्‍व आहे. फुटबॉल क्‍लबमुळे धेंपे या घराण्‍याला सासष्टीतील कित्‍येक ख्रिस्‍ती लोक ओळखतात. याचा निश्‍चितच फायदा भाजपला होऊ शकतो, असे युनायटेड गोअन्‍स डेमोक्रेटिक या राजकीय पक्षाचे उपाध्‍यक्ष आणि राजकीय विश्‍लेषक ॲड. राधाराव ग्रासियस म्‍हणाले.

गोमन्‍तक टीव्‍हीच्‍या ‘साश्‍‍टीकार’ या लोकप्रिय कार्यक्रमात बोलताना राधाराव म्‍हणाले, मी सर्वच मतदारांना किंवा कार्यकर्त्यांना ते पैशांसाठी काम करतात, असे म्‍हणणार नाही. मी कित्‍येक निवडणुकांत आतापर्यंत सक्रिय राहिलेलो आहे. गोव्‍यात आम्‍ही कितीही म्‍हटले तरी मतदार हा स्‍वत:ला विकण्‍यासाठीच सज्‍ज झालेला असतो. त्‍यांचा दाम त्‍यांना मिळाला की सगळे काही शांत होते. यावेळी पल्‍लवी धेंपेंसारख्‍या धनाढ्य घराण्‍यातील उमेदवार रिंगणात आहेत. त्‍यामुळे ही खळखळ जरा अधिकच दिसून येते. ‘गोमन्‍तक’चे ब्‍युराे चीफ सुशांत कुंकळयेकर यांनी ही मुलाखत घेतली असून ती गोमन्‍तक टीव्‍हीच्‍या फेसबुक, यू-ट्यूब आणि इन्‍स्‍टाग्रामवर उपलब्‍ध आहे.

पल्‍लवी धेंपे यांना भाजपने दक्षिण गोव्‍याची उमेदवारी जाहीर केल्‍यानंतर स्‍वत:ला भाजपचे कट्टर कार्यकर्ते म्‍हणवून घेणारे समाजमाध्‍यमांवरून विरोध करत आहेत. ही गोष्‍ट जरी खरी असली तरी कित्‍येकदा सुरवातीची ही अशी खळखळ एक तर उत्‍स्‍फूर्त अशी प्रतिक्रिया असते किंवा कित्‍येकवेळा काही मुख्‍य

कार्यकर्ते आपला भाव वाढवून घेण्‍यासाठी सुरवातीला अशी नाराजी दाखवितात आणि नंतर आपले इप्‍सीत साध्‍य झाल्‍यानंतर त्‍यांची ही खळखळ बंद होते, अशी सूचक प्रतिक्रिया ॲड. राधाराव ग्रासियस यांनी व्‍यक्‍त केली.

शिस्‍तबद्ध विरुद्ध विस्‍कळीत अशी लढत

काँग्रेसबद्दल बोलताना ॲड. ग्रासियस म्‍हणाले, कुणीही काही म्‍हणो गोव्‍यातील निवडणुकीत फक्‍त पैसा हा महत्त्वाचा असतो आणि भाजपकडे जेवढा पैसा आहे त्‍याच्‍या १२० पटींनी कमी पैसा काँग्रेसकडे असेल. त्‍यामुळे या गोष्‍टीवर काँग्रेस कसा मार्ग काढू शकेल, हे पाहावे लागेल. मात्र, नेहमीच पैसा हाच मुद्दा असू शकत नाही, ही गोष्‍टीही तेवढीच खरी आहे. कधी कधी मतदार धडा शिकविण्‍याच्‍या मूडमध्‍ये असतात. जर भाजपचे निष्‍ठावंत कार्यकर्ते अशा मूडमध्‍ये असतील तर गोष्‍ट वेगळी आहे. तरीही दक्षिण गोव्‍यातील लढत ही एका शिस्‍तबद्ध पक्षाच्‍या विरोधात एका विस्‍कळीत पक्षाची लढत आहे, हे विसरता कामा नये.

म्हणून गिरीशना उमेदवारी मिळण्याची शक्यता अधिक...

आपले स्‍वत:चे मत विचारल्‍यास दक्षिण गोव्‍यात काँग्रेसने आपली उमेदवारी कॅप्‍टन विरियातो फर्नांडिस यांना देणेच योग्‍य आहे. पण नेहरू-गांधी कुटुंबाला जो जवळ असतो त्‍यालाच उमेदवारी मिळते ही आजवरची काँग्रेसची रीत आहे.

काँग्रेसकडे गांधी कुटुंबाला जवळचा एक नेता आहे आणि ते म्‍हणजे गिरीश चोडणकर. त्‍यामुळे ही उमेदवारी चोडणकर यांनाच मिळणार ही मला खात्री आहे, असे ग्रासियस यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Top News: चोर्ला घाट अपघातात तरुण ठार, कन्‍हैयाकुमार मृत्यूप्रकरणी खूनाचा गुन्हा नोंद; राज्यातील ठळक बातम्या

Goa Education: गोव्यात आता ITI मध्ये करता येणार दोन नवे कोर्स, 15 जुलैपासून सुरुवात; CM नी दिली महत्वाची माहिती

Bicholim News: कारवर कोसळले झाड; बैलासह म्हशीची सुटका

Assagao Demolition: आसगाव प्रकरणात CM आणि लोबो दाम्पत्याचा हस्तक्षेप! वकिलाचा युक्तीवाद, पूजाला जामीन मिळणार का?

Goa News: ...आणि मुख्यमंत्रीही झाले वारकरी !

SCROLL FOR NEXT