Dhargalim Gram Panchayat Decision on Sunburn Dainik Gomantak
गोवा

Sunburn in Goa: 5 विरुद्ध 4 गणितात 'सनबर्न विजयी'; पंचायतीच्या निर्णयानंतर आता विशेष ग्रामसभा भरवण्याची मागणी

Dhargalim Gram Panchayat Decision on Sunburn: पंचायतीच्या अंतिम निर्णयाप्रमाणे आता गोव्यात यंदा देखील सनबर्न संगीत महोत्सव होणार आहे

Akshata Chhatre

Sunburn Musical Festival Goa 2024

पेडणे : गोव्यात होणाऱ्या सनबर्न संगीत महोत्सवाला रविवारी (१ डिसेंबर) सरकारी मान्यता मिळाली आणि यानंतर यंदाच्या वर्षी २८ ते ३० डिसेंबर पर्यंत गोव्यात सनबर्नचे आयोजन केले जाणार आहे. हा संगीत महोत्सव गोव्यात नकोच या वादाला धरून सोमवारी (दि.२ डिसेंबर) धारगळ पंचायतीची पाक्षिक बैठक भरली. या बैठकीत सनबर्न व्हावा की नाही यावर दोन्ही गटांकडून सखोल चर्चा झाली आणि पंचायतीच्या अंतिम निर्णयाप्रमाणे आता गोव्यात यंदाच्यावर्षी देखील सनबर्न संगीत महोत्सव होणार आहे.

चार विरुद्ध पाच अशा या गणितात शेवटी पाच जणांचा विजय झाल्याने पंचायतीने धारगळीत होणाऱ्या सनबर्न संगीत महोत्सवाला परवानगी दिली आहे. सोमवारी होणाऱ्या बैठकीत जो निर्णय होईल त्याप्रमाणे पुढील दिशा ठरेल असे वक्तव्य सरपंच सतीश धुमाळ यांनी केले होते, पण अजूनही या वादाला पूर्णविराम लागलेला दिसत नाही.

पंचायतीच्या निर्णयानंतर ग्रामस्थांची एक विशेष ग्रामसभा भरवण्याची मागणी केली आहे, तर दरम्यान ग्रामस्थांनी त्यांच्या मागण्या लिखित स्वरूपात देण्याचे पंचायत सचिवांनी आवाहन केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मडगावमध्ये धर्मांतराचा कार्यक्रम? पोलिसांनी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यासोबत केली पाहणी, काय उघडकीस आलं?

Goa Today's News Live: रणजीत सुयश प्रभूदेसाईचे दणदणीत शतक, 41 सामन्यात झोडली सात शतकं

Mike Mehta: 3 दशकांहून अधिक योगदान देणारे तियात्रकार, ‘गोंयकार’पणाचे एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व - माइक मेहता

अग्रलेख: 'वाळू माफिया' अनावर झाल्यास लोकांनी कुणाच्या तोंडाकडे पाहायचे? कुंपणच शेत खाणारी परिस्थिती

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा विटंबना प्रकरण; आरोप निश्चित करण्याचे म्हापसा कोर्टाचे आदेश

SCROLL FOR NEXT