Dharbandora Twitter/Dr. Pramod Sawant
गोवा

धारबांदोडाची ओळख आता 'विद्यानगरी' म्हणून देखील होईल

‘धारबांदोडा (Dharbandora) हा केवळ खाणींचा प्रदेश नव्हे; तर यापुढे तो विद्यानगरी म्हणून ओळखला जाईल. शैक्षणिक साधनसुविधांबरोबरच या भागाचा पर्यटनदृष्ट्या विकास साधण्‍यात येणार आहे’, अशी ग्वाही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

दैनिक गोमन्तक

फोंडा (Ponda): धारबांदोडा (Dharbandora) हा केवळ खाणींचा प्रदेश नव्हे; तर यापुढे तो विद्यानगरी म्हणून ओळखला जाईल. शैक्षणिक साधनसुविधांबरोबरच या भागाचा पर्यटनदृष्ट्या विकास साधण्‍यात येणार आहे’, अशी ग्वाही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (CM Dr. Pramod Sawant) यांनी दिली. धारबांदोडा येथे सातेरी पिसानी शिक्षण संस्थेच्या महाविद्यालय संकुलाच्या पायाभरणी समारंभावेळी ते बोलत होते.

गोव्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर (Bhausaheb Bandodkar) यांनी गोव्यात शिक्षणाची गंगा आणली. गरज भासली तेथे शाळा उभारल्या आणि शैक्षणिक संधी उपलब्ध करून दिली. दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर (Manohar Parrikar) यांनी या शाळांच्या नूतनीकरणावर भर देत शिक्षणासाठी अद्ययावत सुविधा उपलब्ध करण्यासाठी कार्यवाही केली. आज गोव्यातील ९५ टक्के शाळांची दुरुस्ती झाली आहे. तेथे अद्ययावत सुविधा सरकारने उपलब्ध केल्या आहेत. शिक्षणाच्या या सुविधा केवळ निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून नव्हे तर गोवा सुशिक्षित व्हावा, समृद्ध व्हावा या दृष्टीनेच करण्‍यात आल्‍या आहेत, असे सांगून सावंत यांनी गणेश गावकर यांचे शैक्षणिक क्षेत्रातील योगदान उल्लेखनीय असल्याचे नमूद केले.

मंत्री पाऊसकर यांनी सरकार सध्या रस्ते, वीज, पाणी आदी मूलभूत सुविधा प्राधान्यक्रमाने पुरवत असून ‘संजीवनी’ साखर कारखान्‍याच्या उत्कर्षासाठी धोरणात्मक निर्णय घेतले जात असल्याचे सांगितले. ‘संजीवनी’च्या कामगारांना सेवेत कायम करण्यासाठीही प्रयत्‍न सुरू आहेत. धारबांदोडा हे शैक्षणिक हब होण्यासाठी कार्यरत असून आयआयटीच्या उभारणीसाठीही धारबांदोडावासीयांचा पाठिंबा असेल. विनय तेंडुलकर, नरेंद्र सावईकर यांनी गावकर यांच्‍या कार्याचे कौतुक केले. सरपंच स्वाती तिळवे यांनी आपले विचार मांडले. यावेळी प्रा. भास्कर नायक, गौरीश नाईक, अनिल डिंगे, संतोष तिळवे यांचा सन्मान करण्‍यात आला.देशातील अन्य कोणत्याही राज्यात नसतील एवढ्या शैक्षणिक सुविधा आणि साधने गोव्यात उपलब्ध करण्यात आली आहेत.

शैक्षणिक सुविधांत गोवा अव्वल

पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांनी शिक्षणाची मुहुर्तमेढ रोवली तर दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी त्यावर कळस चढवला. विकासाच्या बाता मारणाऱ्या पश्‍चिम बंगाल आणि दिल्लीतही अशा सुविधा उपलब्ध नसतील असा दावा करून मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी उगाच सोशल मीडियावर काहीही डाऊनलोड करून गोमंतकीयांची फसवणूक करू नका, गोवेकर तुम्हाला ओळखून आहेत, असा टोला हाणला.

धारबांदोडा तालुका शारदेचे प्रांगण बनवण्‍यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून नवनवीन महाविद्यालये या भागात उभारली जात आहेत. तसेच या तालुक्‍याचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्यासाठीही सरकार कटीबद्ध आहे. फक्त लोकांचे सहकार्य हवे, असेही मत यावेळी मुख्‍यमंत्री यांनी व्यक्त केले.

यावेळी सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री दीपक प्रभू पाऊसकर, राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर, माजी खासदार ॲड. नरेंद्र सावईकर, माजी मंत्री दयानंद मांद्रेकर, धारबांदोडा सरपंच स्वाती तिळवे, श्री दत्तात्रय देवस्थानचे अध्यक्ष राजेंद्र देसाई, किर्लपाल दाभाळच्या सरपंच शकुंतला गावकर तसेच सातेरी पिसानी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व माजी आमदार गणेश गावकर, त्यांच्या पत्नी सदिच्छा गावकर व इतर मान्यवर मंडळी उपस्थित होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Hindu New Year: 19 मार्चपासून हिंदू नववर्षाची सुरुवात! गुरु अन् मंगळच्या आशीर्वादानं उजळणार 'या' 4 राशींचं नशीब; नोकरी अन् शिक्षणात प्रगतीचा योग

''स्वप्नात वाटलं जीजूंनी पकडलं, म्हणून...'', 7 वर्षे कोर्टाच्या फेऱ्या अन् 19 दिवस खाल्ली जेलची हवा; अखेर पॉक्सो कोर्टाकडून एअरफोर्स जवानाची सुटका

LPG Crisis: क्रिकेटप्रेमींची चिंता वाढवणारी बातमी! आयपीएल 2026 वर गॅस संकटाचं सावट; बीसीसीआय लवकरच घेणार मोठा निर्णय?

Volkswagen Layoffs: ऑटोमोबाईल विश्वात मोठा भूकंप! 'फोक्सवॅगन' 50000 कर्मचाऱ्यांना देणार नारळ; पोर्शे अन् ऑडी सारख्या ब्रँड्सनाही फटका

Dhurandhar 2: रिलीजपूर्वीच ‘धुरंधर ’चा धमाका! विक्रमी ऍडव्हान्स बुकिंग; सगळे रेकॉर्ड तुटण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT