Drunk and Drive Accidents in Goa:
Drunk and Drive Accidents in Goa:  Dainik Gomantak
गोवा

वाढत्या अपघातांना आळा घालण्यासाठी वाहतूक पोलिसांनी नाक्यांवरील गस्त वाढवावी; डीजीपींचे निर्देश

Kavya Powar

Drunk and Drive Accidents in Goa: राज्यातील वाढत्या जीवघेण्या अपघातांची संख्या आणि मद्यपान करून वाहन चालवण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. याबाबत पोलीस महासंचालक जसपाल सिंग यांनी गुरुवारी एक निर्देश जारी करून गोवा पोलिसांच्या वाहतूक कक्षाला ओव्हरस्पीडिंगविरोधात एकत्रित मोहीम राबविण्याचे आवाहन केले.

माहितीनुसार, 3 सप्टेंबरपर्यंत राज्यात मद्यपान करून वाहन चालवण्याच्या एकूण 980 प्रकरणांची नोंद करण्यात आली आहे. गेल्यावर्षी म्हणजेच 2022 मध्ये हा आकडा 795 इतका होता. यंदा वाढलेला हा आकडा चिंतेचे कारण बनला आहे.

याबाबत जसपाल सिंग यांनी अधीक्षक आणि उपअधीक्षकांसोबत बैठक घेतली. त्यावेळी ते म्हणाले की, या गोष्टींना आळा घालण्यासाठी वाहतूक पोलिसांनी गस्त वाढवणे गरजेचे आहे. वाहतुकीचे नियम चालक धाब्यावर बसवतात; त्यामुळे पोलिसांनी रस्त्यावर उपस्थित राहून बेशिस्त चालकांवर कारवाई करावी.

ते पुढे म्हणाले की, प्रत्येक चेकपोस्टवर बाहेरील राज्यातून येणाऱ्या वाहनांची कडक तपासणी संबंधित पोलिसांनी करणे अनिवार्य आहे. मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांची कठोर तपासणी करावी.

तसेच, त्यांनी सांगितले की, ड्रायव्हिंग स्कूल परिवहन विभागाच्या अखत्यारीत येतात, त्यामुळे नव्याने वाहन चालवायला शिकणाऱ्या चालकांना प्रत्येक वाहतूक चिन्हाची सखोल माहिती स्कूलतर्फे दिली गेली पाहिजे.

रस्ते सुरक्षेबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या समितीच्या शिफारशींचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. याबाबत डीजीपींनी मद्यपानामुळे राज्यात घडलेल्या काही अपघातांचा उल्लेख केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Top News: चोर्ला घाट अपघातात तरुण ठार, कन्‍हैयाकुमार मृत्यूप्रकरणी खूनाचा गुन्हा नोंद; राज्यातील ठळक बातम्या

Goa Education: गोव्यात आता ITI मध्ये करता येणार दोन नवे कोर्स, 15 जुलैपासून सुरुवात; CM नी दिली महत्वाची माहिती

Bicholim News: कारवर कोसळले झाड; बैलासह म्हशीची सुटका

Assagao Demolition: आसगाव प्रकरणात CM आणि लोबो दाम्पत्याचा हस्तक्षेप! वकिलाचा युक्तीवाद, पूजाला जामीन मिळणार का?

Goa News: ...आणि मुख्यमंत्रीही झाले वारकरी !

SCROLL FOR NEXT