Kunkeshwar Death Case Dainik Gomantak
गोवा

Kunkeshwar: धक्कादायक! महाशिवरात्रीच्या आदल्यादिवशी गोव्याच्या माय-लेकाने कुणकेश्वरमध्ये संपवले जीवन; देवगड तालुक्यात खळबळ

Goa Tourist Death Case Devgad Kunakeshwar: कुणकेश्वर येथील एका ‘होम स्टे’मध्ये गोव्यातून पर्यटक म्हणून आलेल्या माय-लेकाने एकाच दोरीला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली.

गोमन्तक डिजिटल टीम

देवगड: कुणकेश्वर येथील एका ‘होम स्टे’मध्ये गोव्यातून पर्यटक म्हणून आलेल्या माय-लेकाने एकाच दोरीला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. ही घटना महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी शनिवारी दुपारी सुमारे साडेबारा वाजण्याच्या सुमारास समोर आली. त्यामुळे देवगड तालुक्यात खळबळ उडाली आहे.

शारदा कृष्णा गावडे (वय ६४ वर्षे) आणि सुदेश कृष्णा गावडे (वय ३५ वर्षे), रा. भालखाजन-कोरगाव, अशी मृतांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुदेश हे आई शारदा यांच्यासमवेत शुक्रवारी सायंकाळी सुमारे साडेसात वाजता चारचाकी वाहनाने कुणकेश्वर येथे आले होते. त्यांनी येथील एका ‘होम स्टे’मध्ये मुक्काम केला होता.

शनिवारी सकाळी साडेआठ वाजता गोव्याला परत जाण्याचा त्यांचा बेत होता. मात्र, दुपारी बारा वाजेपर्यंत दोघेही खोलीतून बाहेर न आल्याने ‘होम स्टे’च्या मालकाच्या पत्नीने दरवाजा ठोठावून आवाज दिला. आतून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने संशय आल्याने पडदा उघडून पाहिले असता दोघांनीही गळफास घेतल्याचे आढळून आले. आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

या घटनेची माहिती तात्काळ देवगड पोलिस ठाण्याला देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असता, आई-मुलाने एकाच दोरीच्या साहाय्याने आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी पुढील तपास देवगड पोलिस करीत आहेत. कुणकेश्‍वर (देवगड) येथे आत्महत्या केलेले माय-लेक भालखाजन-कोरगाव येथील असून ते दोघेही सुस्वभावी असल्यामुळे त्यांच्या आत्महत्येची बातमी गावात समजल्यावर सगळ्यांनाच धक्का बसला.

मात्र, ते कुणकेश्‍वरला नेमके का गेले, याचे गूढ उकललेले नाही. भालखाजन-कोरगाव येथील सुदेश कृष्णा गावडे आणि त्याची आई शारदा कृष्णा गावडे यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. सुदेश हा ‘मुत्थुट फायनान्स’मध्ये शिवोली येथे कामाला होता. कुणकेश्‍वर येथे एका हॉटेलच्या खोलीत दोरीच्या साहाय्याने दोघांनी गळफास घेतल्यानंतर हॉटेल मालकांनी पोलिसांना कळविले. देवगड पोलिसांनी याबाबत चौकशी केली असता, हे मृतदेह गोवा राज्यातील रहिवाशांचे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: खरी कुजबुज; विजयचा ‘नेहले पे देहला'

Panaji Municipal Election: पणजी महापालिकेसाठी विरोधक येणार एकत्र? पर्रीकर, नाईकांची तयारी; एकास एक उमेदवार देण्याची व्यूहरचना

Rashi Bhavishya: बम बम भोले! भगवान शंकर देणार आशीर्वाद; 'या' राशींसाठी सुवर्णयोग

Nessai Company Fire: मासळी पॅकिंग कंपनीमध्ये काम सुरू असतानाच उडाला भडका, आगीत कोट्यवधींची हानी Watch Video

"हे कसलं प्रेम?" व्हॅलेंटाईन डे ला प्रेयसी म्हणाली 'मर', अन् NDA ची तयारी करणाऱ्या 17 वर्षीय प्रियकरानं गळफास घेत संपवलं जीवन

SCROLL FOR NEXT