Devendra Fadnavis said BJP is party giving development scheme Dainik Gomantak
गोवा

भाजप योजना देणारा पक्ष: देवेंद्र फडणवीस

गोव्याचे शिल्पकार माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर असून त्याच्या आशीर्वादाने गोव्यात भाजप पुन्हा एकदा बहुमताने विजयी होणार

दैनिक गोमन्तक

वास्को: दहा वर्षे स्थिर सरकार विकासकामे,सामाजिक सुरक्षा, आधुनिकता देण्याचे पूर्ण श्रेय राज्य भाजपला जाते. भाजप योजना देणारा पक्ष असून त्यात आणखीन विश्वास साधण्यासाठी भाजपच्या (BJP) प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपला सहभाग दाखवावा, तसेच स्वर्गीय भाऊसाहेब बांदोडकर नंतर आधुनिक गोव्याचे शिल्पकार माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर (Manohar Parrikar) असून त्याच्या आशीर्वादाने गोव्यात भाजप पुन्हा एकदा बहुमताने विजयी होणार असल्याची माहिती महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली.

मुरगाव सडा येथीलल छत्रपती शिवाजी महाराज व्यासपिठावर आयोजित भाजपच्या जाहीर सभेत महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते तथा गोवा भाजपचे मुख्य प्रभारी देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी त्यांच्यासमवेत मुरगावचे भाजप उमेदवार तथा आमदार मिलिंद नाईक, महाराष्ट्राचे किसान मोर्चाचे अध्यक्ष वासुदेव काळे, माजी मंत्री प्रणव पुके, माजी खासदार धनंजय महाडिक, मुरगावचे नगराध्यक्ष दामोदर कासकर, मुरगाव भाजप गटाध्यक्ष संजय सातार्डेकर, महिला मोर्चा अध्यक्ष छाया होन्नावरकर, युवा मोर्चा अध्यक्ष योगेश बांदोडकर, नगरसेवक दयानंद नाईक, दामू नाईक, प्रजय मयेकर, लिओ रॉड्रिगीस, रामचंद्र कामत, नगरसेविका मृणाली पार्सेकर, मंजुषा पिळणकर, माजी नगराध्यक्ष सारिका पालकर, माजी नगरसेवक संदेश मेस्ता, उद्योजक राजन भोसले, आलेक्स पाशेको, माजी नगराध्यक्ष शशिकांत परब, रवींद्र भवनचे उपाध्यक्ष डॉ. धर्मेंद्र प्रभूदेसाई व इतर पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुढे बोलताना महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की दक्षिण-उत्तर पर्यंत गोव्याला जोडण्यात भाजप यशस्वी ठरले आहे. भाजपने वेगवेगळ्या योजनेतून जनतेच्या हृदयात जागा केली आहे. गोव्यातील युवकांना खाजगी नोकऱ्या राज्यसरकार पाच हजार रुपये देऊन सहकार्य करणार आहे. केंद्र सरकारने गोवा सरकारला विकास कामांना चालना देण्यासाठी चार हजार करोड रुपयांचे अनुदान दिले असल्याने गोव्याचा चौफेर विकास होत आहे. काँग्रेसने गोव्याला सदैव दुर्लक्ष करुन विकास कामापासून वंचित ठेवले होते. तसेच गोव्याला पोर्तुगीज राजवटीत मुक्ती देण्यासाठी सुद्धा काँग्रेस पक्षाने कधीच पुढाकार घेतला नाही. याला पूर्णपणे जबाबदार पंडित नेहरू असल्याचा खळबळजनक आरोप फडणवीस यांनी केला. तसेच मुरगाव बरोबर संपूर्ण गोव्यात भाजप बहुमताने यशस्वीरित्या निवडून येणार असल्याची माहिती शेवटी फडणवीस यांनी दिली.

भाजप उमेदवार मिलिंद नाईक म्हणाले की मुरगावचा विकास साधण्याबरोबर येथील जेष्ठ नागरिक महिलांच्या योजना पुरवण्या युवकांना रोजगार देण्यास भाजप सरकार आपले कार्य सुरूच ठेवणार आहे. देशाबरोबर गोव्याचा विकास भाजप सरकार मुळे होत असल्याची माहिती मिलिंद नाईक यांनी दिली. आज या व्यासपीठावर दोन व्यक्तीची कमतरता भासते. स्व. मनोहर पर्रिकर, तर भाजपचे कार्यकर्ते. स्व. बाबुराव शेट्ये. व्यासपीठावर मनोहर बाईने 2007 ते 2017 पर्यंत मुरगाव वासियाया बरोबर आपले नाते जोडले होते. आज मुरगावच्या विकासात मला महत्त्वाचे सहकार्य लाभले लाभले ते स्व. मनोहर पर्रीकर यांचे. युवकांना रोजगार योजना पुरवण्यासाठी गोव्यात भाजपला बहुमताने निवडून देण्यासाठी तसेच मनोहरर्भाईचे स्वप्न साकार करण्यासाठी येणाऱ्या 14 फेब्रुवारी रोजी भाजपला मतदान करण्याची विनंती मिलिंद नाईक यांनी केली. यावेळी नगरसेवक मृणाली पार्सेकर, सारिका पालकर, शेखर खडपकर, विकास काळे, रवी घोणसेकर, आलेक्स पाशेको यांची भाषणे झाली. प्रास्ताविक नगराध्यक्ष दामोदर कासकर तर सूत्रसंचालन प्रसाद प्रभुगावकर यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: शापोरा – हणजूण येथून ११ वर्षीय मुलगा दोन दिवसांपासून बेपत्ता, शोध सुरु

Randeep Hooda At IFFI: बिरसा मुंडांच्या जीवनावर सिनेनिर्मिती व्हावी! अंदमान सेल्युलर तुरुंगात गेल्यानंतर मात्र.. ; रणदीप हुडाने मांडले स्पष्ट मत

Goa Politics: अदानी प्रकरणावरुन काँग्रेस-भाजप मध्ये कलगीतुरा! पाटकरांचे आरोप; वेर्णेकरांचे प्रत्युत्तर

Pilgao Farmers Protest: पिळगावात तिसऱ्या दिवशीही ‘रस्ता बंद’; खाण कंपनीच्या भूमिकेकडे ग्रामस्थांचे लक्ष

Vidhu Vinod Chopra At IFFI: 'माझ्या सिनेमाच्या पहिल्या 'शो'ला चार-पाचच प्रेक्षक होते..'; चोप्रांनी सांगिलता 'खामोश'चा दिलखुलास किस्सा

SCROLL FOR NEXT