Devendra Fadnavis and Sudin Dhavalikar  Dainik Gomantak
गोवा

मगोपचे नेते सुदिन ढवळीकरांच्या संपर्कात देवेंद्र फडणवीस

दैनिक गोमन्तक

पणजी: विधानसभा निवडणुकीसाठीचे भाजपचे प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी काल (सोमवारी) गोव्याला एका दिवसाची धावती भेट दिली. निवडणुकीचा आढावा घेण्यासाठीच त्यांची ही भेट होती, असे अधिकृतरित्या सांगण्यात आले. दुपारी गोव्यात आलेले फडणवीस रात्रीच्या विमानाने महाराष्ट्रात परतले.

वास्तविक मगोपचे नेते सुदिन ढवळीकर यांच्यासह काही अपक्षांच्या संपर्कात राहून त्यांच्याशी वाटाघाटी करण्यासाठी फडणवीस प्रयत्न करीत आहेत. भाजप सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नुकतेच ढवळीकर यांनी भाजपाबाबतीतील ताठर भूमिका सोडून दिली आहे. केंद्रात भाजपची सत्ता असल्याने गोव्यात वेगवान प्रशासन देणे भाजपलाच शक्य आहे, असे वक्तव्य ढवळीकरांनी अलिकडेच केले आहे.

मुख्यमंत्रिपदाची अट

काँग्रेसला सुदिन ढवळीकरांनी काही अटी घातल्याने त्यांच्यामधील चर्चा खोळंबली असल्याची माहिती मिळते. काँग्रेसबरोबर सरकार स्थापन करायचे झाल्यास मुख्यमंत्रिपदाची पहिली संधी आपल्याला मिळावी, अशी त्यांची अट असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

फडणवीसांनी घेतला अंदाज

फडणवीस यांनी पक्ष नेत्यांकडून निकालाचा अंदाज जाणून घेतला. भाजपला 16 तर काँग्रेसला केवळ 10 जागा मिळतील असे भाजपला वाटते. सर्वात मोठा पक्ष बनल्यामुळे भाजपला सत्तेवर येण्यापासून कोणी रोखू शकणार नाही, असे मत बैठकीत व्यक्त झाले. मुख्यमंत्री सावंत मात्र भाजपा 21 जागा जिंकून स्वबळावर सरकार स्थापन करेल, या मताचे आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Congress: दरमहा सात हजार! पगार की शिक्षा? शिक्षकांना देण्यासाठी भाजप सरकारकडे नाहीत पैसे; काँग्रेस

Goa Today's News Live: दक्षिण गोव्यातील स्विगी डिलिव्हरी बॉईज संपावर

Pramod Sawant: दक्षिणेतील काही राज्य हिंदी समजून देखील घेण्याचा प्रयत्न करत नाहीत; गोवा मुख्यमंत्री

एक देश-एक निवडणूक! प्रत्यक्षात येण्याची वाट कमालीची खडतर; संपादकीय

गोव्याच्या लोकसंस्कृतीत 'घुमट वाद्याला' अनन्यसाधारण स्थान का आहे? चर्मवाद्यांच्या विशेष योगदानाबद्द्ल जाणून घ्या!

SCROLL FOR NEXT