Goa Culture Dainik Gomantak
गोवा

Goa Culture: आध्यात्मिक गोव्‍याचे स्‍वप्‍न साकारा!

Goa Culture: समुद्र महाआरती : विकृतींचा नाश करण्याचे मुख्यमंत्र्यांना आवाहन

दैनिक गोमन्तक

Goa Culture:

ऐतिहासिक मंदिरांचे पुनर्निर्माण व्हावे आणि गोव्याचा इतिहास लोकाभिमुख करण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत प्रयत्नरत आहेत. अशाच प्रकारे शासनाने गोव्यातील विकृतींचा नाश करून आध्यात्मिक गोव्‍याचे स्‍वप्‍न साकारावे, असे प्रतिपादन आध्यात्मिक धर्मगुरू पद्मश्री सदगुरू ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी यांनी केले.

सदगुरू फाऊंडेशन तथा श्री दत्त पद्मनाभ पीठ यांच्या संयुक्त आयोजनाने सदगुरू ब्रह्मेशानंदाचार्य स्वामींच्या दिव्य संकल्पनेतून गोवा आध्यात्मिक महोत्सव मांडवीतीरी परशुराम स्मारकाजवळ साकार झाला. याप्रसंगी मुख्‍यमंत्री म्‍हणाले की, गोव्यात योगसेतू, ज्ञानसेतू, कृषिसेतू आणि अटलसेतू असे चार सेतू निर्माण झाल्यानंतर संत-महंतांच्या पावन पदस्पर्शाने आज खऱ्या अर्थाने योगसेतूचे उद्‌घाटन झाले आहे.

आध्यात्मिक महोत्सव दरवर्षी आयोजित व्हावा आणि समस्त गोमंतकीयांना एकत्रितपणे समुद्र महाआरती करण्याची सुसंधी प्राप्त होईल. त्यासाठी शासनाद्वारे पूर्ण सहकार्य करण्यात येईल.

गोव्याच्या इतिहासात प्रथमच समुद्र महाआरती

सद्‍गुरू फाउंडेशन तथा श्री दत्त पद्मनाभ पीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आध्यात्मिक धर्मगुरू पद्मश्री सद्‍गुरू ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजींच्या दिव्य संकल्पनेने साकारलेला ‘गोवा आध्यात्मिक महोत्सव’ रविवारी पणजीतील मांडवी तिरावरील परशुराम स्मारकाजवळ हजारो भक्तगणांच्या उपस्थितीत झाला.

प्रकट कार्यक्रमारंभी समुद्र किनारी तपोभूमी वेदविदुषी महिला पुरोहितांद्वारे विश्वशांती यज्ञ झाला. तद्नंतर प्रार्थना, अभंग, गजर गोव्यातील शंभरहून अधिक पखवाजवादक, गायक यांच्याद्वारे ससामूहिकरित्या सादर झाला आणि वातावरण भारून गेले.

याप्रसंगी व्यासपीठावर अखिल भारतीय संत समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष जगद्‍गुरू अविचलदेवाचार्य स्वामीजी, जगद्‍गुरू रामानंदाचार्य स्वामी राजेश्वर माऊली सरकार, महाब्रह्मर्षि महामंडलेश्वर कुमार स्वामीजी, महामंडलेश्वर जनार्दन हरी स्वामीजी, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, पर्यटनमंत्री रोहन खंवटे, माजी केंद्रीय कायदामंत्री ॲड. रमाकांत खलप, सद्‍गुरू फाउंडेशनच्या अध्यक्ष अ‍ॅड. ब्राह्मीदेवीजी उपस्थित होत्या.

पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी सरकारने फक्त इथल्या समुद्रकिनाऱ्यांची व मौज मजेची जाहीरात करू नये, तर इथली मंदिर संस्कृती, कलासंस्कृती, मूळ आध्यत्मिक संस्कृती यावर भर द्यावा.
- रामानंदचार्य स्वामी

हा महोत्सव हीच गोव्याची ओळख

आज गोवा आध्यात्मिक महोत्सवातून गोव्यातील संगीत कलेचे दर्शन घडले. खरोखरच या ऐतिहासिक महोत्सवाच्या आयोजनासाठी सद्‍गुरू ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजींचे कौतुक. गोव्याची संस्कृती अनुभवताना अत्यानंद होत आहे. हा महोत्सव म्हणजे गोव्याची खरी ओळख होय. गोवा आध्यात्मिकदृष्ट्या अनुभवण्याचा योग आला असे सांगून महाब्रह्मर्षि महामंडलेश्वर कुमार स्वामीजी यांनी धर्माचे आचरण हेच मनुष्याचे कर्तव्य कर्म आहे. अशा महोत्सवाच्या माध्यमातून आपण आपली संस्कृती जोपासली पाहिजे व या माध्यमातून संस्कृतीचे संरक्षण होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cricket Players Death: क्रीडा विश्वात खळबळ! पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यात 3 क्रिकेटपटूंचा मृत्यू, बोर्डानं घेतला मोठा निर्णय

गुंड जेनिटोची दिवाळी तुरुंगातच; रामा काणकोणकर हल्लाप्रकरणी सर्व संशयितांना 31 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी

सीटवरुन झाला वाद, भावांनी ट्रेनमध्ये बॉम्बची अफवा पसरवली; अम्रपाली एक्सप्रेसमध्ये धावपळ, पोलिसांची उडाली तारांबळ

60 कोटींची टांगती तलवार, शिल्पा शेट्टीचं गोव्यात 'होम-हवन'! बास्टियनची पारंपरिक सुरुवात

डिसेंबर 1986, राजभाषा आंदोलनाने उग्र स्वरूप धारण केले, सासष्टीत जिलेटिन स्‍फोट होत होते, स्‍फोटक वातावरणात 'रवीं'नी मडगाव गाठले

SCROLL FOR NEXT