Goa Illegal Mining  Dainik Gomantak
गोवा

Goa Illegal Mining: बंदी असूनही पिसुर्लेतून खनिज वाहतूक; ग्रामस्थांचा विरोध

न्यायालयाची सरकारला लक्ष घालण्याची सूचना

दैनिक गोमन्तक डिजिटल

Goa Illegal Mining: गावातून खनिज वाहतूक करण्यात येऊ नये, असे परिपत्रक केंद्रीय खाण मंत्रालयाने काढलेले असतानाही पिसुर्ले गावातून वाहतूक केली जात आहे. या खनिजवाहू ट्रकांसाठी पर्यायी रस्ता असूनही त्याचा वापर केला जात नाही.

वाहतुकीवेळी पिसुर्ले गावात धूळ नियंत्रण देखरेख यंत्रणा बसवण्यात आलेली नाही, असे जनहित याचिकादारातर्फे त्याच्या वकिलांनी आज मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिली.

उच्च न्यायालयाने यासंदर्भात आवश्‍यक ते लक्ष घालण्याच्या सूचना करीत सुनावणी तहकूब केली. पिसुर्ले गावातून तीन दिवसांपूर्वी खनिजवाहू ट्रकांची वाहतूक सुरू झाली आहे. वाहतुकीमुळे हवेत मोठ्या प्रमाणात धूळ प्रदूषण होत आहे.

ही यंत्रणा होंडा येथून जाणाऱ्या रस्त्याच्या ठिकाणी उभी असली तरी ही वाहतूक सध्या असलेल्या पर्यायी मार्गाने नेण्यात यावी अशी पिसुर्ले ग्रामस्थांची मागणी आहे अशी माहिती याचिकादारातर्फे खंडपीठाला देण्यात आली.

दुसरीकडे, जनहित याचिका सुनावणीस आली असता प्रतिवादी खनिजवाहू कंत्राटदाराने आवश्‍यक ती परवानगी खाण खात्याकडून घेण्यात आली आहे.

वाहतूक करणाऱ्या रस्त्याच्या बाजूने धूळ नियंत्रण यंत्रणा बसवण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे आवश्‍यक ती रक्कम जमा करण्यात आलेली आहे. मंडळाने दिलेल्या संमतीनुसारच खाण खात्याने ही परवानगी दिली आहे.

प्रदूषण नियंत्रण मंडळ या वाहतुकीवर देखरेख ठेवून आहे व त्याचे उल्लंघन झालेले नाही, अशी बाजू या कंत्राटदार कंपनीच्यावतीने मांडण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shukra Gochar: धन अन् ऐश्वर्याचा कारक शुक्र बदलणार चाल! 4 राशींचे सुखाचे दिवस संपून आव्हानांचा काळ सुरु; आर्थिक बजेट बिघडणार

Goa Water Metro Project: पर्यावरणपूरक बोटी अन् सुरक्षित जलप्रवास! मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या 'गोवा वॉटर मेट्रो' प्रस्तावाला केंद्रसरकारची मंजुरी

खरी कुजबूज: ...आणि युरीचे दोन्ही समर्थक खुश झाले

Goa Politics: आरजीचे राजकीय भविष्य काय? पक्षावर कोणाचा ताबा? वीरेश बोरकरांनी शिस्तपालन समिती नेमली अन्...

Bike Stunt Viral Video: रीलच्या नादात मोडली हाडं! पठ्ठ्याच्या स्टंटबाजीचा थरारक व्हिडिओ व्हायरल; संताप व्यक्त करत नेटकरी म्हणाले, "हा याच लायकीचा होता...''

SCROLL FOR NEXT