Balrath Employee Strike : आश्‍‍वासनानंतर बालरथ कर्मचाऱ्यांचे आंदोलन मागे

मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेनंतर संघटनेने घेतला निर्णय
BalRath Employees on Strike Called Off
BalRath Employees on Strike Called OffDainik Gomantak
Published on
Updated on

BalRath Employees on Strike Called Off: आमच्या मागण्या मान्य करीत येत्या अर्थसंकल्पात यासंदर्भात तरतूद करणार असल्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आश्‍वासन दिल्यानंतर आम्ही आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतल्याचे संघटनेच्या अध्यक्ष स्वाती केरकर यांनी सांगितले.

त्या पणजी येथे मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेनंतर माध्यमांशी बोलत होत्या. यावेळी बालरथ संघटनेचे सचिव शिवकुमार नाईक, राजेंद्र गावडे उपस्थित होते.

BalRath Employees on Strike Called Off
Bardez Water Issue: पाईपलाईनची दुरुस्ती सुरूच, बार्देशमध्ये तीव्र पाणीटंचाई

राज्य बालरथ कर्मचारी संघटनेद्वारे आपल्या विविध मागण्या सरकारने आश्‍वासन देऊन मान्य न केल्याने 27 मार्चपासून आझाद मैदान येथे आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले होते.

दरम्यान केरकर म्हणाल्या, बालरथ योजने अंतर्गत त्यांची नेमणूक असल्याने योजनेत योग्य त्या सुधारणा करत कर्माचाऱ्यांना 10 महिन्याच्या वेतनाऐवजी बारा महिन्यांचे वेतन, विमा, तसेच पीएफ कर्मचाऱ्यांशी बोलून पीएफची तरतूद देखील करणार असल्याचे सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

House Of Abhinandan Mega project Goa
Omkar Elephant Goa
Goa Environmental Movements
Former CDS Anil Chauhan reveals Operation Sindoor strategy
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com