Avadhoot Narvekar preparing the ladoos Dainik Gomantak
गोवा

Traditional Business: उच्च शिक्षित असून सुद्धा ते सांभाळत आहेत गोवेकरांचा 'पूर्वपार व्यवसाय'

त्यांच्या चिकाटीमुळेच ते आज नवउद्योजकांसमोर एक आदर्श व्यावसायिक बनले आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

सांगे येथील 'खाजेकार' म्हणून प्रसिद्ध असलेले नार्वेकर कुटुंबीय गेल्या शंभरहून जास्त वर्षे खाजे, लाडू बनवण्याचा व्यवसाय करत आहे. त्यांच्या पुढील पिढीतले अवधूत मंगलदास नार्वेकर हे मागील 35 वर्षापासून हा व्यवसाय यथोचितपणे सांभाळत आहेत. (Traditional Business)

दरम्यानच्या काळात व्यवसायातील अनेक आव्हानांचा त्यांनी सामना केलाय. जत्रोत्सवासाठी लागणारे बुंदीचे लाडू, लग्न- कार्यासाठी लागणारे लाडू तसेच वेगवेगळ्या प्रकारचे खाजे ते तयार करत असून त्यांच्या चविष्ट पदार्थांची चव लोकांच्या जिभेवर कायम रेंगाळत राहिली आहे.

Avadhoot Narvekar preparing the Khaja

अवधूत नार्वेकर हे आयटीआय मधून डिझेल मेकॅनिकचा अभ्यासक्रम शिकलेले आहेत. उच्चशिक्षित असूनही त्यांनी आपल्या पूर्वजांच्या व्यवसायाकडे कधीच दुर्लक्ष केले नाही. कोरोना महामारीच्या काळातही मोठ्या शिकस्तीने त्यांनी आपला पूर्वपार व्यवसाय न सोडता मोठ्या धीराने या धंद्याला उभारी देण्याचा प्रयत्न केलाय. त्यांच्या चिकाटीमुळेच ते आज नवउद्योजकांसमोर एक आदर्श व्यावसायिक बनले आहेत.

Avadhoot Narvekar preparing the ladoos

मात्र सध्या या कामासाठी कामगार मिळत नसल्याने त्यांना स्वतःहून सर्व काम करावं लागत आहे. या कष्टाच्या व्यवसायाकडे युवा वर्ग पाठ फिरवत असून दिवसेंदिवस हा व्यवसाय टिकवून ठेवणं कष्टप्रद असल्याचे नार्वेकर सांगतात. दर्जेदार खाजे, लाडू बनवणे हा गोवेकरांचा मूळचा धंदा असून या धंद्यात पुढे जाण्यासाठी सरकारने काही प्रमाणात हातभार लावावा अशी विनंतीही त्यांनी केलीय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मोपा विमानतळावर कस्टम विभागाची मोठी कारवाई! 3.16 कोटींचा अंमली पदार्थ जप्त; बँकॉकहून आलेल्या प्रवाशाला बेड्या

Rivona: सफर गोव्याची! पांडवांचा पदस्पर्श लाभलेले, देवदेवतांची प्राचीन मंदिरे असणारे तपस्वींचे ऋषीवन; हिरवेकंच 'रिवण'

Youth Migration: भारतीयांना खुणावतेय परदेशातील करिअर! 52 टक्के तरुणांचा देश सोडण्याचा विचार; 'टर्न ग्रुप'चा खुलासा

किंग कोहली अन् रोहितच्या फौजेचं व्यवस्थापन आता गोमंतकीयाच्या हाती, महेश देसाईंची टीम इंडियाच्या व्यवस्थापकपदी निवड

मुंबईत मराठी माणूस खरंच श्रीमंत झाला की फक्त 'उपरा'? 25 वर्षांच्या सत्तेचा लेखाजोखा अन् वास्तव; आगामी निवडणुकीत कोणाला कौल?

SCROLL FOR NEXT