Cheque Bounce Case Dainik Gomantak
गोवा

Cheque Bounce Case: चेक बाऊन्स प्रकरण, बांधकाम व्यावसायिकाला एक वर्षाचा कारावास; 1 कोटी रुपयांचा दंड

Mapusa Judicial Magistrate Court: प्रकरणात न्यायालयाने त्यांना एक वर्षांची साधी कैद आणि १ कोटी रुपयांची भरपाई देण्याची शिक्षा सुनावली आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी : वास्को येथील ''देशमुख कन्स्ट्रक्शन्स''चे मालक विजय देशमुख यांना म्हापसा येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी ''नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स ॲक्ट''च्या कलम १३८ अंतर्गत दोषी ठरवले आहे. या प्रकरणात न्यायालयाने त्यांना एक वर्षांची साधी कैद आणि १ कोटी रुपयांची भरपाई देण्याची शिक्षा सुनावली आहे.

म्हापसा येथील ''गामा बिल्डर्स''चे मालक रुई दा गामा (६३) यांनी यासंदर्भात तक्रार दाखल केली होती. १७ नोव्हेंबर २०१५ रोजी झालेल्या करारानुसार, विजय देशमुख यांनी देय रकमेपोटी दिलेल्या सुमारे १.१२ कोटी रुपयांच्या धनादेशांचे सादरीकरण करण्यात आले होते. मात्र, संबंधित धनादेश ''अपुरा निधी'', ''खाते बंद'' आणि ''मर्यादेपेक्षा जास्त रक्कम'' अशा कारणांमुळे वटले नव्हते.

न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर देशमुख यांना दोषी ठरवले. मूळ करारातील काही अटींच्या तांत्रिक बाबींमुळे व्याजापोटी दिलेले ४५.३० लाख रुपयांचे सात धनादेश न्यायालयाने कायदेशीरदृष्ट्या अंमलात आणता येणार नसल्याचे नमूद केले. मात्र, उर्वरित रकमेच्या संदर्भात देशमुख यांना जबाबदार धरण्यात आले.

न्यायाधीश ज्यूड सिक्वेरा यांनी आपल्या निकालात म्हटले की, एनआय ॲक्टअंतर्गतचा गुन्हा हा आर्थिक स्वरूपाचा आहे. आरोपीला नोटीस मिळाल्यानंतरही रक्कम भरण्यासाठी पुरेशी संधी होती; परंतु त्यांनी कोणतीही तत्परता दाखवली नाही. त्यामुळे ''प्रोबेशन ऑफ ऑफेंडर्स ॲक्ट''चा लाभ देण्यास नकार दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT