Colva Police Case Dainik Gomantak
गोवा

केस भादरले, बर्फाच्‍या लादीवर झोपवले, इलेक्‍ट्रिक शॉक दिला; गोवा पोलिसांविरोधात संशयिताच्या भावाची तक्रार

Colva Police: कोलवा पोलिसांनी टायसनला मायकल सिद्धी याने दिलेल्‍या तक्रारीवरून अटक केली होती

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव: खुनाचा प्रयत्‍न करण्‍याच्‍या आरोपाखाली कोलवा पोलिसांनी ताब्‍यात घेतलेल्‍या टायसन ऊर्फ नसीर मसूद या गुंडाला बोलते करण्‍यासाठी कोलवा पोलिसांनी त्‍याचे केस भादरले. शिवाय त्‍याच्‍याकडून गुन्‍हा वदवून घेण्‍यासाठी त्‍याला चक्‍क बर्फाच्‍या लादीवर झोपवले आणि इलेक्‍ट्रिक शॉकचा झटकाही दिला, अशी तक्रार टायसनचा भाऊ हुसेन बीन मसूद याने उपअधीक्षकांकडे केली आहे.

२७ जुलै रोजी कोलवा पोलिसांनी टायसनला मायकल सिद्धी याने दिलेल्‍या तक्रारीवरून अटक केली होती. त्‍यानंतर ५ ऑगस्‍ट रोजी त्‍याचा पोलिस कोठडीचा रिमांड वाढवून घेण्‍यासाठी पोलिसांनी त्‍याला न्‍यायालयात आणले असता, पोलिसांनी आपले केस भादरले आणि पायाच्‍या अंगठ्याचे नख उखडून काढली, अशी तक्रार त्‍याने न्‍यायालयात केली होती.

६ ऑगस्‍ट रोजी ‘गोमन्‍तक’ने पहिल्‍या पानावर हे वृत्त छापले होते. त्‍यानंतर ८ ऑगस्‍ट रोजी विजय सरदेसाई यांनी हा मुद्दा विधानसभेत उपस्‍थित केला होता. टायसनचा भाऊ हुसेन याने जी तक्रार दिली आहे, त्‍यात कोलवाचे पोलिस निरीक्षक सतीश पडवळकर आणि इतर अधिकाऱ्यावर आपल्या भावाला मारहाण केल्‍याचा आरोप केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करुन संबंधितांवर निलंबनाची कारवाई करण्‍याची मागणी केली आहे.

ज्‍यावेळी आपल्‍या भावाला पोलिसांनी अटक केली होती. त्‍यावेळी त्‍याचा एक हात मोडला होता. पोलिसांना याची माहिती होती, तरी असताना पोलिसांनी त्‍याच्‍या दुखावलेल्या हातावरच आणखी मारहाण केली. आपल्‍या भावाचे केस खांद्यापर्यंत पोचण्‍याएवढे लांब होते. त्‍याचा मानसिक छळ करण्‍याच्‍या उद्देशाने पोलिसांनी ते भादरुन त्‍याला बोडका केला. एका पोलिसाने त्‍याच्‍या पायाच्‍या अंगठ्याचे नख ओढून काढले. एवढे करून समाधान न झालेल्‍या पोलिसांनी त्‍याचा श्‍वासोश्‍वास बंद करण्‍याचा प्रयत्‍न केला. पोलिसांचे हे कृत्‍य म्‍हणजे सरळ सरळ मानवाधिकाराचे उल्‍लंघन असून यामुळे आपल्‍या भावाला जबर मानसिक धक्‍का बसला आहे आणि त्‍याला शारीरिक त्रासही होत असल्‍याचे त्‍याने आपल्‍या तक्रारीत म्‍हटले आहे.

तक्रार अजून मिळालेली नाही!

टायसनचा भाऊ हुसेन बीन मसूद याने दिलेल्‍या तक्रारीबाबत उपअधीक्षक संतोष देसाई यांना विचारले असता, अजून तरी आपल्‍याकडे अशा प्रकारची कुठलीही तक्रार आलेली नाही, असे त्‍यांनी सांगितले. तक्रार आल्‍यास आवश्‍‍यक ती चौकशी करू असे ते म्‍हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: शापोरा – हणजूण येथून ११ वर्षीय मुलगा दोन दिवसांपासून बेपत्ता, शोध सुरु

Goa Politics: अदानी प्रकरणावरुन काँग्रेस-भाजप मध्ये कलगीतुरा! पाटकरांचे आरोप; वेर्णेकरांचे प्रत्युत्तर

Pilgao Farmers Protest: पिळगावात तिसऱ्या दिवशीही ‘रस्ता बंद’; खाण कंपनीच्या भूमिकेकडे ग्रामस्थांचे लक्ष

Cooch Behar Trophy: गोव्याकडे निर्णायक आघाडी! कर्णधाराचे झुंझार शतक; आता लक्ष गोलंदाजांच्या कामगिरीवर

Vidhu Vinod Chopra At IFFI: 'माझ्या सिनेमाच्या पहिल्या 'शो'ला चार-पाचच प्रेक्षक होते..'; चोप्रांनी सांगिलता 'खामोश'चा दिलखुलास किस्सा

SCROLL FOR NEXT