Luthra Brothers  Dainik Gomantak
गोवा

Deported! बर्च बाय रोमिओ लेनचे मालक लुथरा बंधु बँकॉकमधून डिपोर्ट; दिल्लीतून गोव्यात होणार दाखल, व्हिडिओ आला समोर Watch

Birch by Romeo Lane Fire Case: लुथरा बंधु दिल्लीतील इंदिरा गांधी विमानतळावर दाखल होतील, दिल्लीत दाखल झाल्यानंतर गोवा पोलिसांकडे त्यांना सोपवले जाणार आहे.

Pramod Yadav

पणजी: बर्च बाय रोमिओ लेनचे मालक लुथरा बंधुंना थायलंडमधून भारतात आणले जात आहे. दोघांना डिपोर्ट करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून, आज (१६ डिसेंबर) पुढच्या काही तासांत ते दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल होतील. तेथून त्यांना गोव्यात आणले जाणार आहे. बर्च बाय रोमिओ लेन नाईटक्लबमध्ये आग लागून २५ जणांचा मृत्यू झाला होता.

हडफडे येथे असणाऱ्या बर्च बाय रोमिओ लेन नाईटक्लबला लागलेल्या आगीत २५ जणांचा मृत्यू झाला. या घटनेने गोवा नव्हे तर देशाला हादरवून सोडले आहे. नाईटक्लब आगीत जळत होता त्यावेळी लुथरा थायलंडला निघाले होते. मालक लुथरा बंधुंच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोघांना भारतात आणण्याची प्रक्रिया गेल्या काही दिवसांपासून सुरु होती. बँककॉक पोलिसांनी लुथरा बंधुंना ताब्यात घेतले होते. त्यानंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अखेर त्यांना भारतात आणले जात आहे. बँकॉक येथून दोघांना डिपोर्ट केल्याचा व्हिडिओ समोर आला असून, दोघेही पुढील काही तासांत भारतात दाखल होतील.

लुथरा बंधु दिल्लीतील इंदिरा गांधी विमानतळावर दाखल होतील, दिल्लीत दाखल झाल्यानंतर गोवा पोलिसांकडे त्यांना सोपवले जाणार आहे. सर्व सोपस्कर पूर्ण झाल्यानंतर गोवा पोलिस लुथरा बंधुंना घेऊन गोव्यात दाखल होतील.

दिल्लीत अगोदरच गोवा पोलिसांचे पथक दाखल झाले आहे. ऐन पर्यटन हंगामात घडलेल्या या घटनेमुळे पर्यटन क्षेत्रात काम करणाऱ्यांना चांगलाच धक्का बसला आहे, या घटनेचा राज्याच्या पर्यटनावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT