Lohia Maidan Margao Dainik Gomantak
गोवा

Lohia Maidan: 'हा' तर लोकशाहीवर हल्ला; शॉर्ट सर्किटमुळे लोहियावर सभेला परवानगी नाकारली, आलेमाव म्हणाले भाजपचा फ्यूज काढू

Lohia Maidan Margao: 7 मे रोजी भाजपचा फ्यूज काढून टाकू आणि भाजपची पॉवर बंद करू, असे वक्तव्य विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केले.

Pramod Yadav

Lohia Maidan Margao

घेण्यास परवानगी नाकारणे म्हणजे लोकशाहीवर हल्ला आहे. 7 मे रोजी भाजपचा फ्यूज काढून टाकू आणि भाजपची पॉवर बंद करू, असे वक्तव्य विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केले.

लोहिया मैदानावर सभा घेण्यास परवानगी नाकारल्याबद्दल प्रतिक्रिया देताना विरोधी पक्षनेते म्हणाले की, भाजपचा विकास हाच एक शॉर्ट सर्किट आहे.

लोहिया मैदानाच्या तथाकथित नूतनीकरणावर सरकारने जवळपास 5 कोटी खर्च केले. जानेवारी 2022 मध्ये हे काम पूर्ण व्हायचे होते, परंतु आजपर्यंत लोहिया मैदानाचे काम अपूर्णच आहे. भाजप सरकारने केवळ वरवरची मलमपट्टी केली आहे, असे युरी आलेमाव म्हणाले.

लोहिया मैदानावरील स्टेजच्या मध्यभागी एक दरवाजा बनवला होता जो नंतर नागरिकांनी आक्षेप घेतल्यानंतर बंद करण्यात आला. व्यासपीठामागे असलेला तथाकथित ग्रीन रुम म्हणजे एक कचराकुंडी बनली आहे. स्टेजचा आकार आता कमी करण्यात आला आहे आणि त्यामुळे सभा घेणेही गैरसोयीचे झाले आहे, असे युरी आलेमाव यांनी सांगितले.

गोव्याच्या अस्मितेची आठवण करून देणाऱ्या या सर्व ऐतिहासिक महत्त्वाच्या ठिकाणांकडे सरकार जाणीवपूर्वक डोळेझाक करत आहे.

मी विधानसभेत मुद्दा उपस्थित करून आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना लेखी पत्रे पाठवूनही लोहिया मैदानाला ऐतिहासिक महत्त्वाची जागा म्हणून अधिसूचित करण्यास सरकार टाळाटाळ करत आहे. यातून भाजपचा खरा चेहरा समोर येतो, असे युरी आलेमाव म्हणाले.

नवीन नूतनीकरण केलेल्या प्रकल्पात शॉर्ट सर्किट कसे होऊ शकते? त्याला जबाबदार कोण? कोटय़वधी खर्च झाले तरी कामात गलथानपणा का? हे सरकारने मडगावच्या नागरिकांना समजावून सांगावे, अशी मागणी युरी आलेमाव यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

फुल पैसा वसूल! रोहित शेट्टी आणतोय 'Golmaal 5', गोव्यात होणार शूटिंगची सुरुवात; अजय देवगणनं दिलीये हिंट

Delhi Airport Technical Glitch: 800 फ्लाईट्सना विलंब, अनेक रद्द; दिल्ली विमानतळावर तांत्रिक अडचणीचा हजारो प्रवाशांना फटका

"तुझी मासिक पाळी संपली की सांग...": महिला क्रिकेटपटूचा सिलेक्टरवर लैंगिक अत्याचाराचा आरोप, क्रीडा विश्वात खळबळ

समुद्रकिनारी रंगला भव्य विवाह! तेजश्री प्रधानने गोव्याच्या किनाऱ्यावर केलं 'Destination Wedding' शूट

Goa Today's News Live: काणकोण बसस्थानकाजवळील रस्त्याची दुर्दशा, चालक हैराण

SCROLL FOR NEXT