Dengue In Goa Dainik Gomantak
गोवा

Dengue Cases in Goa: सावधान! मडगावनंतर डिचोलीमध्येही डेंग्यूचे सक्रिय रुग्ण; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

डिचोलीमध्ये डेंग्यूचे दहा रुग्ण

Kavya Powar

Dengue patients increasing In Goa

बदलत्या वातावरणाचा सध्या नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होताना दिसत आहे. डिचोलीमध्ये डेंग्यूचा झपाट्याने प्रसार होत आहे. मागील काही दिवसात डिचोलीमध्ये तापाचे रुग्ण वाढले आहेत.

माहितीनुसार, सध्या डिचोलीमध्ये डेंग्यूचे दहा रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे चिंता अधिकच वाढली आहे. वर्षाच्या अखेरीस अनेकदा साथीच्या आजारांमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले आहे. एकंदरीत परिस्थिती पाहता डेंग्यूने राज्यात पुन्हा एकदा आपले डोके वर काढले आहे.

याचा प्रसार वाढू नये यासाठी नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी मडगावमध्येही डेंग्यूचे 2 रुग्ण आढळल्याचे समोर आले आहे. यावरून राज्यातील काही भागात आता हळूहळू डेंग्यू आपले हात-पाय पसरत असल्याचे दिसून येत आहे.

यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News Today: वाहतूक सुरळीत करण्यासाठी दिवाडी ते पणजी फेरीसेवा

St. Francis Xavier Exposition: गोयचो सायब पावलो!! शव प्रदर्शन सोहळ्याला 170 पाकिस्तानी गोव्यात येणार; व्हिसा मंजूर झाल्याने मार्ग मोकळा

Quepem Crime: पारोडातील महिलेच्या हत्येचे गूढ उकलले,सहा दिवसांनी संशयिताला मध्य प्रदेशातून अटक

गोवा विद्यापीठातही Job Scam! समित्यांमध्ये केरळीयनांची नियुक्ती; गोवा फॉरवर्डचा घणाघात

Goa BJP: महायुतीच्या यशात गोव्याचा 'लक फॅक्टर'! सावंत, राणेंचा प्रचार ठरला लाभदायी

SCROLL FOR NEXT