Dengue Dainik Gomantak
गोवा

मोरपिल्ला भागात डेंग्यूचे थैमान; चाळीसच्या घरात संशयितांची संख्या

आरोग्य खात्यातर्फे खबरदारीचे; रक्ताचे नमुने घेत केली जाणार आणखी चाचपणी

दैनिक गोमन्तक

कुंकळ्ळी: राज्यातील डेंग्यू रुग्णांची वाढती संख्या आरोग्य खात्यासाठी डोकेदुखी ठरली आहे. काल फोंडा तालुक्यात चाळीस डेंग्यू रुग्ण सापडले आहेत तर तशीच स्थिती आता मोरपिर्ला पंचायत क्षेत्रात तयार झाली आहे. कारण या भागात डेंग्यूचे सुमारे पस्तीस ते चाळीस संभावित रुग्ण आढळल्याने आरोग्य खाते खडबडून जागे झाले आहे. चार रुग्णांची चाचणी सकारात्मक आली असून, 30 ते 35 संभावित रुग्ण आढळले आहेत. (Dengue in Morpilla area; Suspect in the forties )

बाळ्ळी आरोग्य खात्याने स्थानिकांच्या सहयोगाने फवारणी सुरू केली आहे. माजी आमदार चंद्रकांत कवळेकर यांनी फवारणी सामग्री उपलब्ध करून दिली आहे. ज्यांना ताप येतो त्यांची चाचणी केली जात असून, ज्यांना अंग दुःखी व ताप येत असेल त्यांनी त्वरित बाळ्ळी आरोग्य केंद्रात तपासणी करून घेण्याचे आवाहन बाळ्ळी आरोग्य केंद्राने केले आहे. वाढती रुग्ण संख्या पाहून आरोग्य केंद्राचे तज्ज्ञ डॉक्टर मोरपिल्ला गावाला भेट देऊन पाहणी करणार असल्याचे समजते.

रक्ताचे नमुने घेत केली जाणार आणखी चाचपणी

मोरपिर्ला येथे पिण्याच्या पाण्याची समस्या असल्याने लोक प्लास्टिक बॅरलमध्ये पाणी साठवून ठेवतात आणि त्यामुळेच डेंग्यू मच्छरांची पैदास होते, असे तज्ज्ञांचे मत आहे. गावात सर्वत्र फवारणी करण्यात येणार असून गरज भासल्यास लोकांचे रक्ताचे नमुने गोळा करण्यात येणार आहेत, असे आरोग्य केंद्रातर्फे सांगण्यात आले. लोकांनी खबरदारीचे उपाय घ्यावे, असे आवाहन आरोग्य केंद्राने केले आहेत.

फोंडा तालुक्यात ही रुग्णांची चाळीशी पार

राज्यातील डेंग्यू रुग्णांची वाढती संख्या आरोग्य खात्यासाठी डोकेदुखी ठरली आहे. फोंडा तालुक्यात तर या रुग्णांचा आकडा चाळीशीकडे पोचला आहे. तर बेतोडा-दत्तगड भागात रुग्‍णांची संख्या जास्‍त आहे. त्‍यामुळे चिंता व्‍यक्त करण्‍यात येत आहे. गोव्याचा शहरी भाग वगळता गोव्याच्या अनेक भागात कचरा समस्या जैसे थे असल्याचं नागरिकांचे मत आहे. अशा कचऱ्यात साठणाऱ्या पाण्यामूळे डेंग्यू वाढीला लागत असल्याचे ही नागरिकांनी निदर्शनास आणून दिले आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून फोंडा तालुक्यात 38 डेंग्यू रुग्णांची नोंद झाली आहे. हा आकडा चाळीशीच्या पार जाण्याचा धोका व्यक्त करण्यात येत आहे. डेंग्यू आटोक्यात आणण्यासाठी फोंडा आरोग्य खात्यातर्फे विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. फोंडा पालिकेच्या सहकार्याने शहर तसेच इतर भागात या उपाययोजना प्रभावी करण्यासाठी आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांनी नगराध्यक्ष तसेच पालिका मुख्याधिकाऱ्यांशी चर्चा केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Illegal Beef Trafficking: बेळगावहून गोव्यात बेकायदेशीर गोमांस वाहतूक, केरी चेकपोस्टवर 400 किलो मांस जप्त; 27 वर्षीय 'सोहील' पोलिसांच्या ताब्यात

Viral Post: 'तेरा नाम लिया तुझे याद किया...' रोहित शर्माकडून कॅप्टन्सी काढून घेतली, वसीम जाफरने शेअर केला गाण्याचा VIDEO

Gulega worship in Tulu Nadu: ..वराह रूपं दैव वरिष्ठं! इतिहास तुळुनाडुतील ’कोला’ उत्सवाचा

Goa Politics: "वेळ आणि जागा ठरवा आम्ही येतो",आप-काँग्रेस भिडले; पालेकर-पाटकरांचा Face-Off लवकरच?

चमत्कार! आता 'त्वचा पेशीं'पासून जन्मणार मूल; वंध्यत्वग्रस्तांना मिळाली नवी आशा; शास्त्रज्ञांची मोठी कामगिरी

SCROLL FOR NEXT