मडगाव: सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर तब्बल दोन महिन्यांनी काल पासून कोलवा येथील सिल्वर सँडस हे बहुमजली हॉटेल पाडण्याचे काम सुरु झाले आहे.गोवा किनारी व्यवस्थापनानै सीआरझेड नियमांचे उल्लंघन करून त्याचे बांधकाम झाल्याचा दावा उचलून धरुन ते जमीनदोस्त करण्याचा आदेश दिला होता.
(demolition work of 'Silver Sands' Hotel started in colva)
त्याला संबंधितांनी आव्हान दिले व हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेले पण मूळ आदेश उचलून धरला गेला. पण विविध कारणास्तव अंमलबजावणी अडली होती. साबांखाने हॉटेल पाडण्यासाठी येणार असलेल्या साधारण सोळा लाख खर्चाचा प्रस्ताव सादर केला व त्यानंतर काल त्या कामासाठी आवश्यक असलेली अवजड यंत्रसामुग्री दाखल होऊन नंतर काम सुरुही झाले.
काय आहे प्रकरण
सासष्टी तालुक्यातील कोलवा येथील हॉटेल सिल्वर सँड्सचे बांधकाम पाडण्याचा गोवा किनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाने (जीसीझेडएमए) आदेश 25 ऑक्टोबर 2021 दिला होता. या आदेशाला हॉटेलच्या संचालकांनी आव्हान दिले होते. ते मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने फेटाळत दणका दिला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.