गोवा: गोवा विधानसभेचे विरोधीपक्षनेते आणि काँग्रेस नेते मायकल लोबोंच्या अडचणीत वाढ झाली आहे. लोबोंच्या बागा डॅक आणि नाझरी रिसॉर्टला टीसीपी खात्याने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. दोन्ही आस्थापनांमध्ये मोठ्या प्रमाणात कायद्याचं उल्लंघन झाल्याचा ठपका नगरनियोजन खात्याने ठेवला आहे. माझ्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात दोन्ही आस्थापनं मोडून टाकणार, असं म्हणत विश्वजीत राणेंनी लोबोंविरोधात दंड थोपटले आहेत.
(vishwajit rane says that he will demolish michael lobos resort in his tenure)
राज्यात सध्या मायकल लोबो आणि विश्वजित राणे यांच्या वादाची जोरदार चर्चा चालु आहेत. दोघांचेही एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांचे सत्र चालू असुन आता मायकल लोबो यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. कारण लोबोंच्या बागा डॅक आणि नाझरी या दोन रिसॉर्टला टीसीपी खात्याने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. दोन्ही रिसॉर्टमध्ये मोठ्या प्रमाणात कायद्याचं उल्लंघन केल्याचं चित्र समोर आले आहे. दरम्यान, माझ्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात दोन्ही रिसॉर्ट मोडून टाकणार असा इशारा टीसीपी मंत्री विश्वजीत राणे यांनी दिला आहे.
काय आहे प्रकरण?
विरोधी पक्षनेते मायकेल लोबो यांनी आज ज्या अधिकाऱ्यांनी योजनांना मंजुरी दिली त्याच अधिकाऱ्यांनी ODP च्या निलंबनाच्या कारणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. गोवा सरकारने एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात कळंगुट-कांदोळी, पर्रा-नागवा- हडफडे आणि वास्कोसाठी ओडीपी निलंबित करण्याची घोषणा केली होती.
विश्वजीत आणि मायकल यांच्यामध्ये वादाची ठिणगी; कोण आहे मायकल ?
मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाचा अभ्यास करून त्यानुसार हस्तक्षेप करणार असल्याचे सांगितले. विशेष म्हणजे, जमिनीशी संबंधित बेकायदेशीरतेबाबत लोबो यांच्यावर अनेक आरोप करणारे टीसीपी मंत्री विश्वजीत राणे यांना मायकलच्या आरोपांबाबत प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले, “कोण मायकल आहे. मी त्याला ओळखत नाही.”
मायकल लोबोंचा हल्लाबोल
पर्रा-नागवा- हडफडे बाह्य विकास आराखड्याअंतर्गत दिलेले ना हरकत दाखले, सनद जर मंत्र्यांनी रद्दबातल ठरवले तर त्या विरोधात कोर्टात जाऊ. मंत्री विश्वजीत गोवा वाचविण्याची भाषा करत आहेत तो देखावा. विश्वजीत कधीच गोव्याचे राखणदार ठरू शकत नाही, विरोधीपक्षनेते मायकल लोबोंचा हल्लाबोल
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.