embankment Dainik Gomantak
गोवा

Canacona News : बंधारे वेळीच अडवा, गाळ उपसा ; काणकोणातील शेतकऱ्यांची मागणी

गोमन्तक डिजिटल टीम

Canacona News : काणकोण, येथील नद्यांतील बंधारे वेळीच अडविण्यात यावे. तसेच नदी पात्रांतील गाळ उपसण्यात यावा, अशी मागणी येथील शेतकरी करीत आहे. बंधाऱ्यांत पाणी अडविण्यात उशीर झाल्यास पिके हातात येण्याच्या वेळी पाण्याची टंचाई भासते.

त्यासाठी ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत सर्व बंधारे अडवण्यात यावे, अशी मागणी युवा शेतकरी प्रसाद वेळीप यांनी केली.

गेल्या वर्षी बंधाऱ्यांत पाणी अडविण्याची प्रक्रिया जानेवारीपर्यंत लांबली होती. तसेच नद्यांत गाळ दाटल्याने पात्र उथळ झाली आहेत. ही पात्रे गाळमुक्त करण्याची गरज आहे. त्यामुळे पाण्याचा साठा वाढण्यास मदत होणार आहे.

तळपण नदी पात्र कुस्के येथे उगमापासून ते पर्तगाळ मठापर्यंत गाळाने भरले आहे. पात्रातील सेंद्रिय खताने भरलेला गाळाचा थर काढून तो जवळच्या शेतजमिनीत घातल्यास जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होणार असल्याचे वेळीप यांनीसांगितले.

तालुक्यातील काही भागात भूगर्भ जलपातळी उन्हाळ्यात प्रचंड प्रमाणात घटत आहे, त्या भागांसाठी तळपण, गालजीबाग व‌ उपनद्यावर उभारलेले सुमारे पन्नास बंधारे वरदान ठरत आहेत. तळपण नदीवर कुस्के-खोतीगावातील उगमापासून वीसपेक्षा जास्त बंधारे आहेत.

पणसुले मळ व अन्य बंधाऱ्यांमुळे खोतीगावातील भूगर्भ जल पातळीत वाढ झाल्याचे जलस्रोत विभागाच्या कनिष्ठ अभियंता कल्पना गावकर यांनी सांगितले.

भूगर्भ जल पातळी वाढविण्यासाठी या बंधाऱ्यांत दर वर्षी पाणी अडविण्यात येत आहे. त्यामुळे बंधाऱ्या शेजारील विहिरीची जल पातळीत वाढ होत आहे. ज्या विहिरी पूर्वी उन्हाळ्यात आटत होत्या त्या विहिरीत आता एप्रिल मे महिन्यात बऱ्यापैकी पाणी साठा असतो, असे गावकर यांनी सांगितले.

काही बंधारे खाऱ्या पाण्यापासून नदीच्या वरच्या पात्राचे रक्षण करण्यासाठी उभारण्यात येतात, त्यामध्ये गालजीबाग नदीवरील भटाबांध, माशे येथे गांड्याबांध, वाकडे नदीवरील एक व गालजीबाग खाडीवरील एक असे तीन बंधारे उभारण्यात येतात. खारे पाणी अडविण्यासाठी मातीचा वापर करण्यात येत आहे, असे गावकर यांनी सांगितले.

नोव्हेंबरपर्यंत सर्व बंधारे अडविणार

यंदा नोव्हेंबरपर्यंत सर्व बंधारे अडवण्यात येणार आहेत. त्याची प्रकिया सुरू करण्यात आली आहे. निविदा जाहीर केल्या आहेत. लवकरच या कामाला सुरवात होईल, असे जलस्रोत खात्याच्या अभियंत्यांनी सांगितले.

जलक्रीडा, मत्स्य पैदासीसाठी वापरा

बंधाऱ्याचा वापर स्थानिक युवक जलक्रीडा वा पोहण्यासाठी करतात, त्याला अधिकृत मान्यता दिल्यास मोठ्या प्रमाणात अंतर्गत पर्यटनाला चालना मिळू शकते. त्याशिवाय हे सर्वच बंधारे अंतर्गत भागात असल्याने गोड्या पाण्यातील मत्स्य पैदास करण्यासाठी या बंधाऱ्यांचा उपयोग करणे शक्य आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bicholim News: भाडेकरूंची डिचोली पोलिस स्थानकात गर्दी! कार्यक्षेत्रात तपासणी मोहिमेला वेग

'गोवा पोलिस' अंमलीपदार्थांविरोधी गंभीर! 'कोकेन जप्ती'प्रकरणी दिल्ली पोलिसांना करणार सहकार्य

Quelossim: ही तर नौटंकी! केळशीची बदनामी केल्याचा व्हेंझी यांच्‍यावर सरपंचांचा आरोप

Sunburn Festival 2024: धार्मिक स्थळी 'असले' कार्यक्रम नकोच! 'सनबर्न' साठीच्या सभेनंतर ग्रामस्थ ठरवणार दिशा

Israel-Iran War: इस्रायल-इराण युद्धानं सर्वसामान्यांचं बजेट कोलमडणार! भारतासह जगभरातील देशांना बसणार फटका

SCROLL FOR NEXT