Cemetery Dainik Gomantak
गोवा

Goa News: स्मशानभूमीच्या जागेचे वाटप करा !

Goa News: कुर्टी - खांडेपार ग्रामसभेत मागणी: आणखी डोंगरकापणी नको, ग्रामस्थांची सूचना

दैनिक गोमन्तक

Goa News: कुर्टी - खांडेपार पंचायत क्षेत्रात कुर्टी येथे सर्व धर्मियांना स्मशानभूमीसाठी सोळा हजार चौरस मीटर जमीन देण्यात आली आहे. हिंदू, मुस्लीम व ख्रिश्‍चनांसाठी असलेल्या या जागेचे अजून वाटप झालेले नाही, हा मुद्दा रविवारी झालेल्या ग्रामसभेत चर्चेला आला.

जोरदार चर्चेनंतर त्यात त्वरित जागेचे रेखांकन करावे आणि सर्व संबंधित धर्मियांना ही जागा द्यावी. स्मशानभूमीसाठी आणखी डोंगर कापू नका, अशीही सूचना ग्रामस्थांनी केली.

कुर्टी - खांडेपार पंचायतीच्या ग्रामसभेत स्मशानभूमीसह कचरा संकलनासाठी खर्च केल्या जाणाऱ्या रक्कम तसेच इतर विषयांवर जोरदार चर्चा झाली. मात्र ग्रामस्थ आणि पंचायत मंडळ यांच्यातील चर्चेतून हे विषय निकाली निघाले.

खांडेपार येथील पंचायत कार्यालयात ही ग्रामसभा रविवारी झाली. यावेळी सरपंच हरेश नाईक यांनी स्वागत केले तर पंचायत सचिवांनी मागील ग्रामसभेचा अहवाल सादर केला.

सरपंच तसेच इतर पंचायत सदस्यांनी आणि पंचायत सचिवांनी ग्रामस्थांच्या प्रश्‍नांना उत्तरे दिली. त्यावर आणखी डोंगर कापला जाणार नाही, आणि स्मशानभूमीची जागा रेखांकन करण्यासंबंधीचा निर्णय लगेच घेण्यात येईल, असे पंचायतीतर्फे सांगण्यात आले.

कचरा संकलनासाठी भरभक्कम पैसा खर्चला जात असून मागच्या काळापेक्षा ही रक्कम मोठी कशी असा सवाल ग्रामस्थांनी केला. त्यावर पूर्वीच्या कंत्राटदाराचे कंत्राट रद्द केले असून बीडीओंनी काही प्रश्‍न उपस्थित केल्याचे पंचायत सचिवांनी सांगितले.

भंगारअड्ड्यांचा प्रश्‍न ऐरणीवर

पंचायतक्षेत्रातील भंगारअड्ड्यांचा प्रश्‍नही ग्रामस्थांनी उपस्थित केला. एक भंगारअड्डा पंचायतीकडून कोणतीच परवानगी न घेता सुरू कणऱ्यात आला आहे, त्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. वाहतूक कंपन्यांची कार्यालयांकडून अनागोंदी चालली असून लोकांना त्रासदायक स्थिती निर्माण करणाऱ्या अशा कार्यालयांच्या परवान्यांचे नूतनीकरण करू नये, असे ग्रामस्थांनी सूचवले. इतर अनेक विषयांवर चर्चा झाली.

अंगणवाडी सेविकांना त्वरित रक्कम द्या!

पंचायतक्षेत्रातील अठ्ठावीस अंगणवाड्यांचा प्रश्‍नही ग्रामसभेत चर्चेला आला. या अंगणवाड्यांना पंचायतीकडून ठराविक रक्कम देण्यात येत होती, मात्र काही काळापूर्वी ही रक्कम बंद करण्यात आल्याने अंगणवाडी सेविकांनी ही रक्कम त्वरित द्यावी, अशी मागणी केली.

अंगणवाड्या ज्या ठिकाणी चालतात, तेथील घर मालकाचे नाव व फोन क्रमांक देण्याची सूचना पंचायतीतर्फे करण्यात आली आहे. ही माहित दिल्यानंतरच रक्कम देण्यात येईल, असे सांगण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: गाडी मागे घेण्यावरून वाद पेटला, दगडफेक करून पर्यटकांना मारहाण; काचेच्या बाटलीने स्वतःलाही केले जखमी

Goa Highway Toll: गोव्याच्या हद्दीत लागणार टोल? पत्रादेवी येथे बांधकाम सुरू; महाराष्ट्रातूनही विरोधाची शक्यता

Rawanfond: रावणफोंड उड्डाणपुलाचा खर्च 21 वरून 54 कोटींवर! मुख्‍यमंत्री, मडगावच्‍या आमदारांनी खुलासा करावा; काँग्रेसचा आरोप

Goa Live Updates: भरकटलेला ओंकार हत्ती गोव्यात दाखल

Goa Politics: खरी कुजबुज; ‘ते’ माजी आमदार पुन्हा उतरणार रिंगणात?

SCROLL FOR NEXT